- परिणाम झालेली पाने खुडून नष्ट करणे.
- रोगाला प्रतिकार करू शकणाऱ्या या वाणाचे बियाणे लावणे.
- आलटून पालटून पिके घेणे आणि स्वच्छता राखणे यामुळे रोगाची तीव्रता कमी होते.
- जमीन थायोफानेट मिथाईल ७०% WP या द्रव्याने 300 ग्रॅम प्रति एकर या दराने भिजवणे
- मेटलक्सिल ८% आणि मॅन्कोझेब ६४% WP यांनी ५०० ग्रॅम प्रति एकर या दराने फवारणी करावी.
- प्रति एकर ५०० ग्रॅम सुडोमोनास फ्लोरसन्स फवारावे.
सरकारने एफपीओ योजना सुरू केली आहे यामुळे ८६% शेतकऱ्यांचा फायदा होईल.
भारतीय शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने नुकतीच एक महत्त्वाकांक्षी योजना सुरु केले आहे. यामध्ये सर्व देशभर सुमारे दहा हजार एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (शेतकरी उत्पादक संस्था) सुरू करण्यात येतील. हे एफपिओ एक हेक्टर पेक्षा कमी जमीन मालकीची असणाऱ्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मुख्यतः फायदेशीर ठरतील. एका माध्यम वृत्तानुसार अशा शेतकऱ्यांची देशातील एकूण संख्या सुमारे ८६ टक्के आहे.
एफपीओ म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन या सदस्यांवर आधारित संस्था आहेत. म्हणजेच एफपीओ मध्ये शेतकरी हे सदस्य असतील. या संस्थांमध्ये शेती विपणन म्हणजे मार्केटिंग, पिके उत्पादन, मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा समावेश असेल. यामुळे शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४४०६ कोटी रुपये राखून ठेवले आहेत. या एफपीओ संस्था येत्या पाच वर्षात म्हणजे २०२४ पर्यंत कार्यरत होतील.
या प्रकल्पामुळे लहान शेतकऱ्यांना शेती प्रक्रियेमध्ये ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्यांच्या समाधानासाठी एक मंच उपलब्ध होईल. २९ फेब्रुवारीला या योजनेचे उद्घाटन करताना स्वतः पंतप्रधान असे म्हणाले की हे एफपीओ शेतकऱ्यांना व्यावसायिक बनवतील.
Shareकलिंगड पिकावरील बुरशीजन्य केवडा किंवा तांबडी भुरी रोग कसा ओळखावा
- पानाच्या पातळ भागावर खालच्या बाजूला पाण्याने भरलेल्या जखमां सारखे घाव दिसून येतात.
- वरच्या पृष्ठभागावर पाण्याने भरलेल्या घावांसारखेच कोन असलेले टोकदार डाग दिसून येतात.
- हे घाव सुरुवातीला जून पानांवर दिसतात आणि मग हळूहळू कोवळ्या पानांवर ही दिसू लागतात.
- हे घाव वाढतात तसे सुरुवातीला त्यांचा रंग पिवळा दिसतो किंवा मग सुकून ते पिंगट तपकिरी होतात.
- परिणाम झालेल्या वेलांना फळे व्यवस्थित येत नाहीत.
ग्रामोफोन यांनी मुगाच्या पिकासाठी जमीन तयार करण्यासाठी मूग समृद्धी किट आणले आहे.
- या किटमध्ये मुगाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक समाविष्ट केलेले आहेत.
- मुग समृद्धी किट मध्ये अनेक प्रकारचे फायदेशीर जिवाणू असतात.
- या जिवाणू मध्ये पोटॅश आणि फॉस्फरस जीवाणू, ट्रायकोडर्मा व्हिरीडी, ह्युमिक ऍसिड आणि रायझोबियम जिवाणू हे प्रमुख आहेत.
- हे किट सर्व प्रकारच्या सूक्ष्म जीवांचे मिश्रण करून बनवले जाते.
- या किटचे एकूण वजन सहा किलो आहे ते एक एकर जमिनीसाठी उपयुक्त आहे.
काकडीमध्ये जमीन सुपीक करण्यासाठी खोल मुळे असलेल्या मिश्र पिकाची पद्धत
- काकडीच्या रोपांची मुळे जमिनीत उथळ असल्यामुळे आलटून पालटून खोल मुळे असलेली मिश्र पिके घेण्याची गरज नसते.
- फळांची प्रत सुधारण्यासाठी आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी पाच संध्यापर्यंतचे दुय्यम अंकुर छाटून टाकावेत.
- रोपांना टेकू दिल्यामुळे फळे कुसणे थांबवायला मदत होते.
कलिंगडाच्या पिकासाठी जमीन आच्छादनाचे महत्व
- प्लास्टिक मल्चिंग तरबूज की फसल में लगने वाले कीड़ों, बीमारियों और खरपतवारों से बचाती है।
- काले रंग की पॉलिथीन के द्वारा खरपतवारों का नियंत्रण किया जाता है और साथ ही हवा, बारिश व सिंचाई से होने वाले मृदा कटाव को भी यह रोकती है।
- पारदर्शी पॉलीथिन का उपयोग मृदा जनित रोगों और नमी संरक्षण को नियंत्रित करने में किया जाता है।
दोडक्याच्या सुधारित शेतीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
- कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन अ याचा उत्तम स्रोत आहे
- उष्ण आणि दमट हवामानात पिकवले जाते
- तपमान ३२ ते ३८ डिग्री सेंटीग्रेड असावे
- दोडक्याची पेरणी करण्यासाठी निचरा होणारी पद्धत अधिक योग्य समजली जाते.
- उन्हाळ्यात या पिकाला दर पाच सहा दिवसांनी पाणी देणे आवश्यक आहे.
- तोडणीला उशीर केला तर यातले तंतू अत्यंत कडक होतात.
१) शेतकरी त्यांच्या शेतात आरती वाणाच्या (व्ही एन आर बियाणी) दोडक्याची लागवड करून अधिक चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
अनु. | आरती दोडके (व्ही एन आर बियाणी) | |
1. | पेरण्याचा काळ | मार्च |
2. | बियाण्याचे प्रमाण | प्रति एकर एक ते दोन किलो |
3. | दोन ओळीत पेरण्याचे अंतर | १२० ते १५० सेंटीमीटर |
4. | दोन रोपात ठेवण्याचे अंतर | ९० सेंटिमीटर |
5 | पेरणीची खोली | दोन ते तीन सेंटीमीटर |
6. | रंग | आकर्षक हिरवा |
7 | आकार | लांबी २४- २५ सेंटीमीटर रुंदी २.४ इंच |
8 | वजन | २०० ते २२५ ग्राम |
9 | पहिली तोडणी | ५५ दिवस |
भोपळा, कारले, काकडी, कलिंगड इत्यादी पिकांच्या शेतीसाठी कोणते हवामान योग्य आहे?
- वेलवर्गीय भाज्या या उपोष्ण कटिबंधीय हवामानात होतात आणि त्यांची उत्तम वाढ होण्यासाठी आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते
- त्यांची चांगली वाढ आणि उत्तम फळधारणा होण्यासाठी रात्र आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे १८ ते २२ डिग्री सेल्सिअस आणि ३० ते ३५ डिग्री सेल्सिअस असणे योग्य आहे.
- २५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानाला बिया उत्तम प्रकारे आणि वेगाने रुजून येतात.
- योग्य तापमानाला वाढवलेल्या रोपांना मादी फुले आणि फळे जास्त प्रमाणात येतात.
बटाट्याची साले फेकू नका ती तेवढीच महत्त्वाची आहेत!
- बटाट्याच्या सालात पोटॅशियम आढळते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
- बटाटे सालासकट खाल्ल्यामुळे शरीराला धोकादायक अशा अति नील किरणांचा परिणाम कमी होतो.
- बटाट्याच्या सालात भरपूर प्रमाणात पोषक द्रव्य असतात त्यामुळे शरीराची चयापचय क्रिया दुरुस्त होण्यास मदत होते
- बटाट्याची साले आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात कारण त्यात उत्तम प्रमाणात लोह असते त्यामुळे रक्तक्षयाचा धोका कमी होतो.