Major Diseases and Their Control Measures of Wheat

तांबेरा (गेरवा) हा गव्हाच्या पिकावरील मुख्य रोग असून गव्हामध्ये पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा), पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा),काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) यासह चार प्रकारच्या तांबेर्‍याचा संसर्ग आढळतो.

लक्षणे –

 

  • पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा):- पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा) हा रोग प्यूसीनिया स्ट्रिफॉर्मिस बुरशीमुळे होतो.नारिंगी-पिवळ्या रंगाच्या बीजामुळे तो गव्हावरील इतर प्रकारच्या तांबेर्‍याहून लगेच वेगळा ओळखता येतो. या  बीजातून एकमेकांना चिकटलेल्या सूक्ष्म पुटकुळया निर्माण होतात आणि पानांच्या शिरांना समांतर असे त्यांचे चट्टे तयार होतात. बीजे पानांच्या वरील बाजूस, पर्णआवरणावर, कुसळांवर आणि तुसांमध्ये आढळतात. 

 

  • पोषक परिस्थिति:- थंड आणि दमट हवामानात पिकामध्ये पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा) रोगाची लागण होते. संसर्ग होण्यासाठी पानांवर ओल असणे आणि 10-15°C इष्टतम तापमान आवश्यक असते. लागण झाल्यापासून 10-14 दिवसात पुटकुळया तयार होतात. रोगामुळे उत्पादनात 25% पर्यंत घट होऊ शकते. 

 

  • पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा):- पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा) प्यूसिनिया ट्राइटिसिनिया बुरशीमुळे होतो. हा रोग राय धान्य आणि ट्रिटिकेल या धान्यांच्या पिकात देखील होतो. पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) लालसर-नारिंगी रंगाची बीजे निर्माण होतात आणि त्यापासून लहान 1.5 मिमी आकाराच्या, वर्तुळाकार ते अंडाकार आकाराच्या पुटकुळया तयार होतात. त्या पानांच्या वरील बाजूला असतात. पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या फक्त वरील बाजूस असतात तर पिवळ्या तांबेर्‍यामुळे  (पट्टेरी तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या दोन्ही बाजूला असतात.  

 

  • पोषक परिस्थिति:- पुटकुळया येण्यासाठी 15 ते 20º C तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनामुळे पानांवर ओल असणे आवश्यक असते. संसर्ग झाल्यावर 10-14 दिवसांनी उठणार्‍या पुटकुळया हे रोगाचे आढळून येणारे पहिले लक्षण असते. कापणींनंतर उन्हाळ्यात पुन्हा उगवणार्‍या गव्हाच्या रोपांमुळे रोगाची साथ चालू राहत असल्याने अशी रोपे काढून  पानांच्या तांबेर्‍याचे (गेरवा तांबेरा) नियंत्रण करणे किंवा त्याच्या साथीला काही काळ रोखणे शक्य होते. 

 

  • Black Rust (Stem Rust):– काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोग पुसिनिया ग्रॅमिनिस बुरशीमुळे होतो. गव्हाशिवाय बार्ली राय आणि  ट्रिटिकेल या धान्यांच्या पिकात देखील या रोगाची लागण होते. काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोगामध्ये लालसर-करड्या रंगाच्या, लंबगोल पुटकुळ्या किंवा चट्टे खोड आणि पानांवर उमटतात. काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोगाच्या पुटकुळ्या पानांच्या दोन्ही बाजूला असतात तर पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या फक्त वरील बाजूस असतात. पुटकुळ्या फुटून बाहेर पडलेला भुरा वारा आणि अन्य वाहक इतर रोपांपर्यंत पोहोचवतात आणि रोगाचा प्रसार वाढतो.

 

  • पोषक परिस्थिति:- काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोग इतर प्रकारच्या तांबेऱ्याहुन अधिक म्हणजे 18-30°C तापमान असताना होतो. संसर्ग होण्यासाठी 15 ते 20º C तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनामुळे पानांवर ओल असणे आवश्यक असते आणि सुमारे सहा तासात पूर्ण रोपाला लागण होते. संसर्ग झाल्यानंतर 10-20 दिवसांनी पुटकुळया आढळून येतात. 

नियंत्रण:-

  • कापणींनंतर उन्हाळ्यात पुन्हा उगवणारी गव्हाची रोपे नष्ट करा. 
  • पिवळे डाग पडल्यास पीकपालट करणे महत्वाचे असते. 
  • रोग प्रतिकारक वाण वापरण्याने कमी खर्चात आणि पर्यावरण पोषक पद्धतीने रोगाचे नियंत्रण करता येते. 
  • वाढीच्या काळात पिकाचे बारकाईने निरीक्षण करणे रोगाचे तातडीने निदान होण्यासाठी आवश्यक असते. 
  • एकाच घटकाचा समावेश असलेल्या बुरशीनाशकांचा पुन्हापुन्हा वापर टाळा. 
  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराईड 45% डब्ल्युपी 320 ग्रॅम/ एकर या प्रमाणात किंवा प्रोपिकोनाझोल 25% ईसी 240 मिलि/ एकर या प्रमाणात फवारा. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management in Gram

  • हरबर्‍याच्या पिकात जंगली चाकवत, जंगली मेथी, मरवा, कंद, मोथा, दूब अशा अनेक प्रकारचे तण उगवते.

  • हे तण पिकबरोबर पोषक तत्वे, आर्द्रता, जागा आणि प्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा करत त्याला हानी पोहोचवतात. त्याशिवाय तणाद्वारे पिकात बियाणे आणि गुणवत्तेला प्रभावित करणार्‍या अनेक रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो.

  • तणाद्वारे होणारी हानी रोखण्यासाठी त्याचे वेळीच नियंत्रण करणे अत्यावश्यक असते. हरबर्‍याच्या पिकासाठी दोन वेळा निंदणी करणे पुरेसे असते. पहिली निंदणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी करावी आणि दुसरी निंदणी 50-55 दिवसांनंतर करावी.

  • मजूर उपलब्ध नसल्यास पेरणीनंतर लगेचच पॅन्ड़ीमैथालीन 30 ई.सी. ची प्रती हेक्टर 2.50 लीटर मात्रा 500 लीटर पाण्यात फवारावी. त्यानंतर 20-25 दिवसांनी एक निंदणी करावी. अशा प्रकारे हरबर्‍याच्या पिकाची तणाने होणारी हानी रोखता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil Preparation and Sowing Time for Wheat

  • उन्हाळ्यात नांगरणी करावी.

  • तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी.

  • 2 -3 वेळा कल्टिव्हेटर वापरुन शेताला सपाट करावे.

  • पेरणीसाठी सुयोग्य वेळ

  • असिंचित:- ऑक्टोबर महिन्याचा मध्य ते नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा

  • अर्धसिंचित:- नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा

  • सिंचित (वेळेवर):- नोव्हेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा

  • सिंचित (उशिरा):- डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

(Hindi) समृद्धि किट

समृद्धि किट

समृद्धि किट
तंत्रज्ञान ब्रॅंड मात्रा लाभ
एनपीके जिवाणूचे मिश्रण टीम बायो 3 (टीबी 3) 3 किलो/एकर रोपांच्या उत्पादकाचा थेट संबंध रोपांच्या निरोगी आणि भरघोस वाढीशी असतो. नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस), पालाश (पोटॅश) अशी उर्वरके आपण मातीत मिसळतो, पण  त्या पोषक तत्वांचा मोठा हिस्सा रोपांना मिळू शकत नाही. आपण हे जीवाणू अशा अनुपलब्ध पोषक तत्वांचे उपलब्ध अवस्थेत रूपांतर करण्यासाठी वापरतो.
जस्त (झिंक) विरघळवणारे जिवाणू ताबा जी 4 किलो/एकर भारतातील अधिकांश शेतजमिनीत जस्ताचा (झिंक) अभाव असल्याबाबत किंवा जस्त असले तरी उपलब्ध अवस्थेत नसल्याबाबत आणि त्यामुळे रोपांच्या वाढीस अडथळा येत असल्याबाबत अनेक लेखांमध्ये लिहिलेले असते. हा अभाव दूर करण्यासाठी आपण जस्त (झिंक) विरघळवणारे जिवाणू वापरतो. जस्त (झिंक) रोपांना उपलब्ध करून देण्यासाठी हे जिवाणू मातीत मिसळणे आवश्यक असते.
ट्रायकोडर्मा विरीडी ट्रायको शील्ड

कॉंबॅट

2 किलो/एकर ट्रायकोडर्मा विरिडी हे एक जैविक बुरशीनाशक आहे. ते माती, बियाण्यातील रोगजनकांना मारते. त्यामुळे मूळ कुज, खोड कुज आणि अन्य बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते.
समुद्री शेवाळाचे सत्व लाटू 4 किलो/एकर हे उत्पादन ह्यूमिक अॅसिड, समुद्री शेवाळ, अमीनो अॅसिड अशा अनेक उत्पादनांचे मिश्रण आहे. ह्यूमिक अॅसिड मृदेची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच मातीची जलधारण क्षमता वाढवते. समुद्री शेवाळ रोपांमध्ये अमीनो अॅसिड निर्माण करते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेस सहाय्य होते. परिणामी रोपांचा चांगला विकास होतो आणि त्यांचे आरोग्य सुधारते.
मायकोरायझा क्रिस्टोरायझा 4 किलो/एकर हे रोपाच्या मुळांच्या वाढीस आणि विकासास सहाय्य करतात.  ते नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फेट), पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, मॅग्नीशियम,तांबे, जस्त, बोरॉन, सल्फर आणि मोलिब्डेनमसारखे पोषक तत्वे मातीतून मुळांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे रोपांना अधिक मात्रेत पोषक तत्वे मिळतात. ते पिकाची प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते. मायकोरायझा मुळांची वाढ घडवून आणत असल्याने पीक जास्त जागेतून पाणी शोषून घेऊ शकते.

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Carrot fly:-

 गाजरावरील माशीचे नियंत्रण:-

  • गाजर कुळाशी संबंधित सर्व पिकांसाठी 3-5 वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.

  • प्रोफेनोफोस 50 ईसी @ 400 मिली / एकर मात्रेची फवारणी करावी.

  • क्विनॉनोलफॉस 25 ईसी @ 300 मिली / एकर मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Damage of Carrot fly:-

हानीची लक्षणे:-

  • गाजरावरील माशी विकसित होणार्‍या गाजराच्या आतील बाजूने चारही बाजूंनी अंडी घालते.

  • सुमारे 10 मिमी लांब अळी गाजराच्या मुळांच्या बाहेरील बाजूस मुख्यत्वे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खाऊन हानी करते. हळूहळू ती मुळात प्रवेश करते आणि आतील भागास हानी पोहोचवू लागते.

  • गाजराची पाने सुकू लागतात. काही पाने पिवळी तर काही लाल रंगाची होतात. परिपक्व मुळांच्या सालींवर निळसर करड्या रंगाची भोके दिसतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

 

Share

Prevention/Control/Treatment of Mastitis:-

स्तन शोथ रोगामुळे होणार्‍या आर्थिक हानीच्या मूल्यमापनातून आश्चर्यकारक तथ्य समोर आले आहे की हा रोग प्रत्यक्षपणे जेवढी हानी करतो त्याहून अनेकपट जास्त अप्रत्यक्ष आर्थिक हानी पशुपालकांना सोसावी लागते. काही वेळा  स्तन शोथ रोगाची लक्षणे प्रकट आढळून येत नाहत पण दुधातील घट, दुधाच्या गुणवत्तेतील घट आणि पाझर आटल्यावर जनावराच्या (ड्राय काऊ) स्तनाला जी आंशिक किंवा पूर्ण हानी होते ती पुढील वेताच्या वेळी समजून येते.

नियंत्रण:-

  • जनावरे बांधण्याची/ बसण्याची आणि धार काढण्याची जागा स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.
  • धार काढण्यासाठी योग्य तंत्र वापरावे. त्यामुळे आचळाला कोणतीही इजा होऊ नये.
  • आचळाला झालेल्या कोणत्याही इजेवर (किरकोळ खरचटणे देखील) योग्य उपचार तातडीने करावेत.
  • धार काढण्यापूर्वी आणि धार काढल्यावर आचळ औषधी द्रावणाने (पोटॅशियम परमॅगनेट 1:1000 किंवा क्लोरहेक्सिडीन 0.5  प्रतिशत) स्वच्छ करावेत.
  • दुधाची धार केव्हाही जमिनीवर मारू नये.
  • वेळोवेळी दुधाची तपासणी (काळ्या भांड्यात धार धरून किंवा प्रयोगशाळेत) करून घ्यावी.
  • पाझर आटलेल्या जनावराचे उपचार केल्यास वेतानंतर स्तन शोथ रोग होण्याची शक्यता जवळपास संपते. त्यासाठी पशुवैद्याशी संपर्क साधावा.
  • रोगी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे आणि त्यांची धार देखील वेगळी काढावी. असे करणे शक्य नसल्यास रोगी जनावराची धार सर्वात शेवटी काढावी.

उपचार:-

रोगाचा यशस्वी उपचार करणे सुरुवातीच्या अवस्थेतच शक्य असते. अन्यथा रोग वाढल्यास आचळ वाचवणे अवघड जाते. त्यापासून वाचण्यासाठी दुधाळ जनावराच्या दुधाची तपासणी वेळोवेळी करवून घेऊन जीवाणुनाशक औषधांचे उपचार पशुवैद्यांकडून करून घ्यावेत. सहसा ही औषधे आचळात नळीद्वारे किंवा मांसपेशीत इंजेक्शनद्वारे दिली जातात.

आचळात नळीने औषधे देण्याचे उपचार सुरू असताना जनावराचे दूध पिण्यायोग्य नसते. त्यामुळे अशा औषधाची शेवटची मात्रा दिल्यावर 48 तासापर्यंत त्या जनावराचे दूध वापरू नये. उपचार मधेच न सोडता पूर्ण करणे देखील अत्यावश्यक असते. त्याशिवाय किमान चालू वेतात जनावर पुन्हा सामान्य दूध देऊ लागेल अशी आशा ठेवू नये.

प्रतिबंध:-

स्तन शोथ रोगाच्या प्रभावी प्रतिबंधासाठी खबरदारीचे पुढील उपाय योजावेत:

  • दुभत्या जनावरांच्या राहण्याच्या जागेची नियमित साफसफाई आवश्यक आहे. त्यासाठी फिनाईल किंवा अमोनिया कम्पाउन्ड फवारावे.
  • धार काढल्यानंतर आचळाची सफाई करण्यासाठी लाल पोटाश किंवा सेव्हलोन वापरता येईल.
  • दुभत्या जनावरांचा पान्हा आटल्यास ड्राय थेरेपीद्वारे योग्य ते उपाय करावेत.
  • स्तन शोथ झाल्यास तातडीने पशुवैद्याचा सल्ला घेऊन औषधोपचार करावेत.
  • निश्चित कालावधीनंतर धार काढावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Spacing and bed preparation for potato

बटाट्याच्या पिकासाठी शेताची मशागत

हाताने किंवा कुदळीने सर्‍या–नळया पाडून दोन सर्‍यांमध्ये 45 सेंटीमीटर आणि कंदांमध्ये 20 सेंटीमीटर अंतर राखून पेरणी करा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

control measures of cutworms in onion

कांद्यावरील कातरकिड्याचे नियंत्रण

  • पेरणी करताना मातीत कार्बोफ्यूरान @ 7.5 किलो/एकर या प्रमाणात मिसळा.
  • क्लोरोपायरीफॉस 20% ईसी @ 500 मिली/एकर फवारा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Cutworms in onion

  • लहान अळ्या पिवळसर राखाडी रंगाच्या असतात आणि नंतर त्या तपकिरी रंगाच्या, बुळबुळीत, स्पर्श करताच गुंडाळी करून घेणार्‍या होतात. 
  • कातरकिडयाचे पतंग गडद राखाडी-करड्या रंगाचे असतात आणि त्यांच्या पंखांवर वेगवेगळ्या आकाराचे ठिपके असतात. 
  • ते रात्रीच्या वेळी जमिनीलगत कांद्याची बीजरोपे कुरतडतात आणि दिवसा लपून बसतात.   
  • लहान अळ्या कांद्याच्या पर्णसंभारावर अधाशीपणे चरतात. पण नंतर त्या वेगळ्या होऊन मातीत शिरतात. 
  • पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share