Suitable climate for pea cultivation

मटारसाठी उपयुक्त हवामान:-

  • मटारचे उत्पादन वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानात करता येते.
  • मटारसाठी थंड आणि कोरड्या हवेची आवश्यकता असते.
  • थंड हवा जास्त काळ राहिल्यास उत्पादन वाढते.
  • 15-20 डिग्री से. तापमान मटारच्या पिकासाठी उत्तम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control Of Downy Mildew in Cauliflower

फुलकोबीच्या अंगक्षय रोगाचे नियंत्रण:-

  • खोडांवर तपकिरी डाग दिसतात. त्यांच्यावर पांढर्‍या, मुलायम, रोम असलेल्या बुरशीची वाढ होते.
  • पानांच्या खालील बाजूवर जांभळ्या तपकिरी रंगाचे डाग पडतात. त्यांच्यावर पांढर्‍या, मुलायम, रोम असलेल्या बुरशीची वाढ होते.
  • फुलकोबीच्या शेंड्यावर संक्रमण होऊन तो सडतो.

नियंत्रण:-

  • गरम पाणो (50 OC) आणि थायरम (3 ग्रा./ ली.) वापरुन अर्धातास बीजसंस्करण करावे.
  • संक्रमित भाग कापून वेगळे काढावेत आणि कापलेल्या भागावर कॉपर ऑक्सीक्लोराइड (3 ग्रॅम/ली.) लावावे.
  • पिकावर मॅन्कोझेब 75 % @ 400 ग्रॅ/ एकर ची 10-15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • पीक चक्राचे अवलंबन करावे आणि शेतात स्वच्छता ठेवावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Intercultural Practices in Cucumber

खिर्‍याच्या शेतातील कामे:-

  • खिरा हे तंतुमय मुळांचे पीक असल्याने त्याच्या शेतात खोलवर अंतरस्य क्रिया करणे आवश्यक नसते.
  • पावसाळी हंगामात निंदणी, खुरपणी करून मुलांवर माती घालून ती झाकणे आवश्यक असते.
  • छाटणी करण्यासाठी सर्व दुय्यम फांद्या पाच गाठींच्या अंतरावर छाटल्याने फळांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते.
  • खरीपाच्या हंगामात रोपाला आधार दिला जातो. त्यामुळे फळे सडण्याचे प्रमाण कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Season of Planting of Cabbage

पानकोबीच्या लागवडीसाठी योग्य वेळ

पानकोबीच्या लागवडीसाठी योग्य वेळ:-

पानकोबीच्या लागवडीची वेळ वाण आणि वातावरणीय परिस्थितीवर अवलंबून असते.

लवकरच्या हंगामातील वाणाची पेरणी मे महिना ते जून महिना या काळात केली जाते.

मध्य हंगामातील वाणांची पेरणी जून महिन्याचा शेवटचा आठवडा ते जुलै महिन्याच्या मध्यापर्यंतच्या काळात केली जाते.

मध्य उशीराच्या हंगामातील वाणाची पेरणी ऑगस्ट महिन्यात केली जाते.

उशीराच्या हंगामातील वाणाची पेरणी सप्टेंबर महिना ते ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंतच्या काळात केली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

 

Share

Disease Free Nursery Raising For Tomato

टोमॅटोच्या पिकासाठी रोगमुक्त नर्सरी बनवणे:-

  • पेरणीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
  • पेरणीपुर्वी शिफारस केलेले जिवाणूनाशक वापरुन बीजसंस्करण करावे.
  • एकाच प्लॉटमध्ये पुन्हापुन्हा नर्सरी बनवू नये.
  • नर्सरीच्या पृष्ठभागावरील मातीचा कार्बेन्डाझिम 5 ग्रॅम/वर्ग मी. वापरुन उपचार करावा आणि त्याच रसायनाच्या 2 ग्रॅम/ लीटर पाणी मात्रेने नर्सरीत दर 15 दिवसांनी ड्रेंचिंग करावे.
  • मृदा सोर्यकरण करण्यासाठी पिकाच्या पेरणीपुर्वी उन्हाळ्यात नर्सरी वाफ्याला 250 गेजच्या पॉलीथीन शीटने 30 दिवस झाकून ठेवावे.
  • आद्रगलन रोगाच्या जैव-नियंत्रणासाठी ट्रायकोड्रमा विरिडी 1.2 किलोग्रॅम/ हे. ची मात्रा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share