Major seed quality characters

पिकांच्या चांगल्या बियाण्यांचे गुण आणि वैशिष्ठ्ये

पिकांच्या चांगल्या बियाण्यांचे गुण आणि वैशिष्ठ्ये:- ज्याची अंकुरण क्षमता अधिक आहे आणि जे रोग, कीड, तणाचे बियाणे आणि इतर पिकांचे बियाणे यापासून मुक्त आहे ते बियाणे चांगले असते. चांगले बियाणे पेरून शेतकरी आपले उत्पादन आणि उत्पन्न वाढवू शकतो. परंतु खराब बियाणे पेरल्याने शेतीतील खते, पाणी, मशागत इत्यादीवरील शेतकर्‍याचा खर्च आणि मेहनत वाया जाते. पिकांच्या चांगल्या बियाण्यांचे गुण आणि वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे असतात:-

  • बियाण्याची भौतिक शुद्धता
  • बियाण्याची आनुवंशिक शुद्धता
  • बियाण्याचे गुण, आकार, आकृति आणि रंग
  • बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण
  • बियाण्याची परिपक्वता
  • बियाण्याची अंकुरण क्षमता
  • बियाण्याची जीवन क्षमता

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Intercropping in vegetables

भाजीपाल्यातील आंतरपिके:- भाजीपाल्याची पिके कमी वेळात होतात आणि अधिक उत्पादन देतात. त्यामुळे त्यांना मिश्रित अंतरवर्ती आणि चक्रीय पद्धतीने अन्य पिकांबरोबर लावता येते. आंतरपिक किंवा मिश्र पीक घेताना भाजीपाल्याच्या विकासाची गती, मुळे पसरणे, पोषक प्रकृति, कीड आणि रोगांचा हल्ला, बाजारातील मागणी इत्यादि बाबींचा विचार करावा. पीक पद्धति स्थिर नसावी आणि मोसम, कीड आणि रोगांचा हल्ला, बाजारभाव आणि मागणी व उत्पादकाच्या आवश्यकतेनुसार बदलावी.

क्र.    भाजीचे नाव आंतरपीक

1.)    टोमॅटो – केळी, लिंबू, कापूस, भेंडी, झेंडू, तुर, मका

2.)    वांगी -गाजर, फूलकोबी, मेथी, पानकोबी, हळद, मका

3.)    मिरची – बटाटा, शलगम, चवळी

4.)    पानकोबी – लिंबू, गाजर, मुळा, वांगी

5.)    फूलकोबी – पालक, वांगी, मका, गाठकोबी

6.)    कांदा – गाजर, मुळा, कोथिंबीर, शलगम

7.)    लसूण – बीटरूट, मुळा, गाजर

8.)    मटार –बाजरी, मका, सूर्यफूल, पेरु

9.)    फरसबी – वांगी, मिरची, झेंडू, मका

10.)   चवळी – फरसबी, कोथिंबीर, मका, बाजरी, केळी

11.)   भेंडी – कोथिंबीर, गवार

12.)   दुधीभोपळा – चवळी, पडवळ, चवळई, हिरवी काकडी

13.)   घोसाळे – पालक, टोमॅटो

14.)   काकडी – चवळी, पालक

15.)   कारले – लोब्या, चवळी, ओवा, सॅलट (लेट्युस)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

बजट सत्र 2018-19 में कृषि क्षेत्र के मुख्य बिंदु

सरकारने आगामी खरेदी दरम्यान पिके उत्पादन खर्चाच्या किमान दीड पट किमतीने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांना खर्चाच्या किमान दीड पट किंमत मिळेल याची खबरदारी घेण्यासाठी बाजारभाव आणि एमएसपी यातील फरकाची रक्कम सरकार देईल.

– 86 टक्क्यांहून अधिक शेतकरी लघु किंवा सीमान्त शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी बाजारा पोहोचणे सोपे नाही. त्यामुळे सरकार त्यांना डोळ्यासमोर ठेवून इन्फ्रास्ट्रक्चर तैय्यार करेल.

– औषधी वापराच्या वनस्पतींचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रोत्साहन देईल.
– जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.
– टोमॅटो, बटाटा, कांदा यांचा वापर मोसमाच्या आधारे वर्षभर होतो. त्यासाठी ऑपरेशन फ्लडच्या धर्तीवर ऑपरेशन ग्रीन लॉन्च केले जाईल, त्यासाठी 500 कोटी रुपयांची वेगळी तरतूद केली जाईल.
– मासेमार आणि पशुपालकांना देखील क्रेडिड कार्ड मिळेल.
– 42 मेगा फूड पार्क बनतील.
– मत्स्य पालन आणि पशुपालनासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.
– शेतकरी कृषि लोन सुविधेपासून वंचित राहतात. ते बंटाईदार असतात. त्यांना बाजारातून कर्ज घ्यावे लागते. नीति आयोग शेतकर्‍यांना कर्ज मिळण्याची सुविधा पुरवण्यासाठी व्यवस्था बनवत आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share