Root rot control in Garlic

नियंत्रण:- लागण झालेली रोपे तातडीने उपटावीत. पेरणीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे. लसूणच्या बियाण्याला गरम पाण्याने संस्कारित करून 50% पर्यन्त रोगाचे नियंत्रण करता येते. पेरणी करताना गड्ड्यांना मेन्कोजेब 2 ग्रॅम/ ली. मिश्रणात संस्कारित करावे. उभा पिकावर 45 ग्रॅम प्रति पम्प कार्बेन्डाजिम 12% + मेन्कोजेब 60% ची फवारणी करून ड्रेंचिंग करावे

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Time of fertilization in Onion

कांद्याला खत घालण्याची योग्य वेळ:-

  1. शेताची मशागत करतेवेळी
  2. रोपे लावताना
  3. रोपे लावल्यानंतर 20-30 दिवसांनंतर
  4. रोपे लावल्यावर 30-45 दिवसांनंतर
  5. रोपे लावल्यावर 45-60 दिवसांनंतर
  6. काही कारणाने खतांची पूर्ण मात्रा देता न आल्यास काही लवकर विरघळणारी उर्वरके 75 दिवसांचे पीक असताना देता येतात.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Manures and fertilizers in Peas

सामान्यपणे 20 टन चांगल्या प्रतीचे शेणखत पेरणीच्या पूर्वी सुमारे दीड महिना द्यावे. हेक्टरी 25 किलोग्रॅम नायट्रोजन 70 किलोग्रॅम फॉस्फरस 50 किलोग्रॅम पोटाश द्यावे. उर्वरकांचे मिश्रण पेरणीच्या वेळीच बियाण्याच्या रांगेपासून 5 सेमी अंतरावर आणि बियाण्याहून 5 सेमी जास्त खोल द्यावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Weed control in Carrot

गाजरातील तणाचे नियंत्रण करण्यासाठी 2 ते 3 वेळा निंदणी-खुरपणी करावी. त्याचवेळी छटाई करून रोपांमधील अंतर 4 ते 5 सेंटीमीटर ठेवावे. मुळे वाढू लागल्यावर सर्‍यांवर मातीचा हलका थर द्यावा. तणाचे नियंत्रण करण्यासाठी हेक्टरी 3.5 लीटर पेंडामेथलीन फवारावे. ही फवारणी करताना शेतात दमटपणा असणे आवश्यक आहे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Management of Irrigation in Garlic

लसूण पिकासाठी पाणी व्यवस्थापन:-

पेरणीनंतर पहिल्यांदा पाणी द्यावे.

कोंब फुटल्यावर तीन दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे.

त्यानंतर 10-15 दिवसांतून पाणी द्यावे.

उन्हाळ्यात 5-7 दिवसातून पाणी द्यावे.

गड्डे तयार झाल्यावर पाण्याला ताण द्यावा.

एकूण 15 वेळा पाणी देण्याची आवश्यकता असते.

पीक पक्व होताना जमीनीत दमटपणा कमी असू नये अन्यथा गड्ड्याच्या विकासावर विपरीत परिणाम होतो.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Management of Stem fly in Pea

खोड माशी या किडीपासुन होणारे नुकसान टाळण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापूर्वी पेरणी करणे टाळावे. प्रादुर्भाव सुरू होताच प्रभावित फांद्या तोडून नष्ट कराव्यात. ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पेरणी करणे उत्तम. पेरणी करताना हेक्टरी 7.5 किलोग्राम फोरेट 10 जी किंवा 25 किलो कार्बोफुरन 3 जी द्यावे. पिकावर तीन वेळा ऑक्सीडमेटन मेथाइल 25 ईसी 750 मिलीलीटर पाण्यात प्रति हेक्टर फवारावे. पहिली फवारणी कोंब फुटल्यानंतर आणि इतर दोन दोन आठवड्यांच्या कालावधीने कराव्यात.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

What to do for more yield in Gram?

फुलोरा येण्याच्या वेळी आणि त्यानंतर 10 दिवसांनी पुन्हा 2% यूरिया पानांवर फवारावा. बियाण्याचे प्रिमिंग (4-5 तासांसाठी बियाणे भिजवत ठेवणे) आणि 10 सेमी खोलीवर पेरणी करणे पावसाळी परिस्थितीत उत्पादकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Suitable Climate for Wheat

गव्हासाठी सुयोग्य वातावरण:-

गहू हे पीक मुख्यता थंड आणि कोरड्या हवेत घेतले जाते. त्यामुळे पेरणीच्या वेळी 20 ते 22 डि. से., वाढीच्या कालावधीत 25 डि. से. आणि पक्वतेच्या वेळी 14 ते 15 डि. से. तापमान सर्वोत्तम असते.

तापमान जास्त असल्यास पीक लवकर पक्व होते आणि उत्पादन घटते. धुक्यामुळे पिकाचे बरेच नुकसान होते. मोड येण्याच्या वेळी धुके पडल्यास बियाणे रुजण्याची शक्ती गमावते आणि  त्याचा विकास थांबतो.

दिवस लहान असताना पाने आणि ओंब्यांची वाढ अधिक होते तर दिवस मोठा असताना मोड येण्यास सुरुवात होते. वार्षिक 60-100 से. मी. पर्जन्यमान असलेला भाग गव्हाच्या शेतीसाठी उत्तम असतो.

रोपांच्या वाढीसाठी वातावरणात 50-60 टक्के आर्द्रता असणे उपयुक्त असते. हिवाळ्यातील थंडीचे आणि उन्हाळ्यातील उष्णतेचे दिवस गव्हाच्या पिकासाठी उपयुक्त समजले जातात.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Weed Management of Gram (chickpea)

तणाचा बंदोबस्त हे सर्वात महत्वाचे ठरते. अंकुर फुटण्यापूर्वीच्या तणनाशकांपैकी पेंडामेथलीन हे सर्वात प्रभावी तणनाशक असल्याचे सिद्ध झालेले आहे. अंकुर फुटल्यानंतरच्या काळात क्यूजेलोफ़ोप ईथाइल हे सर्वोत्तम तणनाशक आहे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Seed treatment of wheat

गव्हाचे बीजसंस्करण:-

मूळ कूज, लांब काणी, गोसावी काणी अशा जिवाणूजन्य रोगांचा प्रतिकार करण्यासाठी पेरणीपुर्वी गव्हाच्या बियाण्याला कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% किंवा कार्बेन्डाजिम 12% + मेनकोझेब 63% 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा टेबुकोनाज़ोल DS 1 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.

उधईपासून बचाव करण्यासाठी लिए क्लोरोपायरीफास 4 मिली प्रति किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share