Management of Bark Eating Caterpillar in Guava

पेरूची साल खाणारी अळी:- या किडीच्या लागणीची ओळख शिरा, फांद्या, खोडे आण बुंधा यावरील अनियमित आकाराच्या भेगा व भोके आणि त्यावर दिसणार्‍या जाळ्या, पोखरलेल्या लाकडाचे अवशेष आणि किड्यांच्या मळावरून पटवता येते. मुख्यता शिरा आणि फांद्यांच्या जोडावर भोके दिसतात. कोवळ्या फांद्या सुकतात आणि मारून जातात. त्यामुळे झाडे रोगग्रस्त दिसतात.

प्रतिबंध:-·

  •  या किडीचा प्रसार रोखण्यासाठी बाग स्वच्छ ठेवावी.
  • लागणीची सुरुवात झाली आहे का हे ओळखण्यासाठी कोवळ्या शिरा वाळल्या आहेत काय हे पहावे. ·
  • लागणीच्या सुरूवातीला अळीने पाडलेल्या भोकात लोखंडी तार खुपसून अळीला मारावे.  ·
  • लागण पसरलेली असल्यास जाळयांना काढून कापसाच्या बोलयाने डायक्लोरोवास 0.05% चे मिश्रण भोकात भरावे किंवा मोनोक्रोटोफोस 0.05% किंवा क्लोरोपाईरीफास 0.05% इंजेक्शन ने भरून भोक माती लावून बुजवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>