टरबूज उत्पादनासाठी राजस्थानमधील दोन रियासतांमध्ये युद्ध का झाले?

When the war broke out in two princely states of Rajasthan for the production of watermelon

टरबूज पिकाची लागवड आजकाल बर्‍याच शेतकर्‍यांकडून केली जात आहे, आणि त्यापासून त्यांना चांगला फायदा देखील होत आहे. पण आपणास माहिती आहे का, की इतिहासात एकदा टरबूज लागवडीमुळे दोन रियासतांमध्ये युद्ध सुरु झाले होते. होय, ही घटना राजस्थानमध्ये इ.स.1644 मध्ये घडली होती, जेव्हा बीकानेर आणि नागौर राज्यांमध्ये टरबूजाच्या कापणीसाठी युद्ध सुरु झाले होते आणि हजारो सैनिक मारले गेले.

बीकानेर आणि नागौर रियासतच्या सीमेवर उगवलेल्या टरबूज पिकासाठी दोन शेतमालकां मधील संघर्ष हे या युद्धाचे सुरुवातीचे कारण होते. वास्तविक, बीकानेर राज्यातील शेवटच्या गावामध्ये टरबूज पीक लावले होते. या टरबूज पिकाची बेल पसरत-पसरत दुसऱ्या रियासतच्या गावामध्ये पोहोचली. जेव्हा टरबूजची फळे वाढू लागली, तेव्हा त्याच फळांवर हक्क दाखवण्यासाठी हे युद्ध झाले. या युद्धात, बीकानेरचे रियासत जिंकले गेले आणि नागौरच्या सैनिकांचा वाईट पराभव झाला.

स्रोत: न्यूज़ 18

Share