-
कापूस पिकामध्ये हलक्या पावसानंतर तण बाहेर येऊ लागते.
-
त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हाताने तण काढावे.
-
रासायनिक व्यवस्थापनामध्ये अरुंद पानांच्या तणांसाठी क्विज़ालोफ़ॉप इथाइल 5% ईसी [टरगा सुपर] 400 मिली/एकर या दराने वापर करावा.
-
पहिल्या पावसानंतर 3-5 दिवसांनी किंवा 2-3 पानांच्या अवस्थेत पाइरिथायोबैक सोडियम 10% ईसी + क्विज़ालोफ़ॉप इथाइल 4% ईसी [हिटवीड मैक्स] 400 मिली/एकर या दराने वापर करू शकता.
-
ही समस्या टाळण्यासाठी, जेव्हा पीक लहान असेल तेव्हा ते जमिनीच्या पृष्ठभागावर फवारावे. तण नाशकाचा उपयोग नोजलच्या वरील भगत हुडसह वापरा
कापूस पिकांंमध्ये तण व्यवस्थापन
- रसायनांद्वारे तण नियंत्रण साठी उगवण्यापूर्वी (पेरणीनंतर 72 तासांच्या आत) 700 मिली पेन्डीमेथालीन 38.7% सी.एस. किंवा पेन्डीमेथालीन 30% ईसी 200 लिटर पाण्यात मिसळा आणि एक एकर दराने मातीमध्ये फवारणी करा.
- प्रथम खुरपणी कोयता किंवा करप्याचा साहाय्याने पिकांंच्या उगवण्यापूर्वी 25 ते 30 दिवसांच्या आत करावी.
- जेव्हा तण 2-3 पाने अवस्थेत असते, तेव्हा पायरिथियोबेक सोडियम 6%, ईसी + क्यूजालोफोप एथिल 4% ई.सी. 350 मिली प्रती 200 लिटर पाण्यात मिसळून, एक एकर शेतात फवारणी करावी. शेतात ओलावा असणे आवश्यक आहे.
- पिकात अरुंद पानांचे तण दिसल्यास, एकर शेतात क्यूजालोफोप एथिल 5% ई.सी. 400 मिली किंवा प्रोपाकिजाफाप 10% ई.सी. 300 मिली प्रती 200 लिटर पाण्यात मिसळावे व एक एकर क्षेत्रात फवारणी करावी.
- विस्तृत पानांच्या तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मातीच्या पृष्ठभागावर 200 लिटर स्वच्छ पाण्यात 500 मिली प्रति एकरी पैराक्वाट डाईक्लोराइड फवारणी करावी आणि पिकांच्या 1.5 फूट भागांवर एक हूड लावून पिकांचे संरक्षण करावे. हे निवडक तणनाशक किलर आहे.
मूग पिकामध्ये तण व्यवस्थापन कसे करावे?
मूगातील तण व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे कार्य आहे, जे न केल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट हाेते. हि तणे मूग पिकाची पोषकद्रव्ये, पाणी , प्रकाश, स्थान इत्यादींमध्ये स्पर्धा करतात आणि पिकाची वाढ, उत्पादन आणि गुणधर्म कमी करतात. किडे, कीटक, रोग इत्यादी कारणांपेक्षा तणांमुळे होणारे नुकसान जास्त होते. तण नियंत्रणामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे योग्य वेळी तण नियंत्रित करणे. पुढीलप्रकारे तण प्रतिबंधित केले जाऊ शकते.
प्रतिबंध पद्धत- या पद्धतीत सर्व क्रियांचा समावेश आहे, ज्याद्वारे शेतात तणांचे प्रवेश रोखता येऊ शकते जसे की, प्रमाणित बियाण्यांचा वापर, चांगल्या कुजलेल्या शेण आणि कंपोस्ट खतांचा वापर, सिंचन नाल्यांची साफसफाई जमिनीची मशागत किंवा पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची वापरा पूर्वी योग्य साफ सफाई इत्यादी.
यांत्रिकी पद्धत- तण नियंत्रित करण्याची ही एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. पिकांच्या सुरुवातीच्या काळात पेरणी नंतर 15 ते 45 दिवसांत पिकांना तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. साधारणपणे दोन वेळा खुरपणी करावी. पहिली पेरणीनंतर 15-20 दिवसांनंतर आणि दुसरी 30-35 दिवसांनी केल्यामुळे तणनियंत्रण निट पध्दतीने होते. परंतु यामध्ये जास्त काळजी घेतली पाहिजे नाही तर पिकांच्या मुळांना नुकसान होते तसेच वेळ जास्त लागतो आणि मजुरीदेखील जास्त लागते.
रासायनिक पद्धत- तणनाशकांचा वापर करून तणांचे योग्य नियोजन करता येते. या पद्धतीमुळे वेळ बचतीसह प्रति हेक्टर खर्च कमी होतो. परंतु या रसायनांचा वापर करताना सावधानी बाळगणे आवश्यक आहे. तणनाशकाचे प्रमाण, वापरायची वेळ, त्याचा प्रकार, पीक इत्यादी बाबी लक्षात घेऊनच तणनाशकाचा वापर करावा. पेंडीमेथिलिन (स्टोम्प एक्सट्रा ) सारखे तणनाशक पेरणीनंतर ७२ तासांच्या आत ७०० मिली प्रति एकर प्रमाणे २०० लिटर पाण्यात मिसळून वापर करावा. मुगाच्या पिकात मोठ्या पानाचे तण २-४ पानाच्या अवस्थेत असताना क्विझलफोप इथाईल ५ इ सी (टरगा सुपर) किंवा प्रॉपाकूझालोफोप १० इ सी ३०० मिली प्रति एकर प्रमाणे २०० लिटर पाण्यात मिसळून वापर करावा.
ShareWeed Management in Gram
-
हरबर्याच्या पिकात जंगली चाकवत, जंगली मेथी, मरवा, कंद, मोथा, दूब अशा अनेक प्रकारचे तण उगवते.
-
हे तण पिकबरोबर पोषक तत्वे, आर्द्रता, जागा आणि प्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा करत त्याला हानी पोहोचवतात. त्याशिवाय तणाद्वारे पिकात बियाणे आणि गुणवत्तेला प्रभावित करणार्या अनेक रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो.
-
तणाद्वारे होणारी हानी रोखण्यासाठी त्याचे वेळीच नियंत्रण करणे अत्यावश्यक असते. हरबर्याच्या पिकासाठी दोन वेळा निंदणी करणे पुरेसे असते. पहिली निंदणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी करावी आणि दुसरी निंदणी 50-55 दिवसांनंतर करावी.
-
मजूर उपलब्ध नसल्यास पेरणीनंतर लगेचच पॅन्ड़ीमैथालीन 30 ई.सी. ची प्रती हेक्टर 2.50 लीटर मात्रा 500 लीटर पाण्यात फवारावी. त्यानंतर 20-25 दिवसांनी एक निंदणी करावी. अशा प्रकारे हरबर्याच्या पिकाची तणाने होणारी हानी रोखता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share
Weed Management in Corn
मक्यातील तणाचे नियंत्रण
- एट्राजीन 50% डब्लू.पी. @500 ग्रॅम/ एकर 200 लीटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी अंकुरणापूर्वी वापरावे.
- पेरणीनंतर 20-25 दिवसांनी किंवा 4-5 पाने फुटल्यावर 2,4-D डायमेथाइल अमीन सॉल्ट 58% एस.एल.@ 600 मिली/ एकरचे द्रावण फ्लॅट पॅन नोझलने फवारावे.
- तणाला 4-6 पाने फुटलेली असताना टेम्बोट्रायोन 42% एससी @ 115 मिली/ एकर फवारावे.
- तणनाशकाचा वापर करताना मातीत पुरेशी ओल हवी.
- तणनाशकाचा वापर केल्यावर मातीची हलवाहलव करू नये.
- कडधान्याबरोबर पेरणी केली असल्यास एट्राजीन आणि 2,4-D वापरू नये. त्याऐवजी पेंडीमेथलीन @ 300 ग्रॅम/ एकर अंकुरणापूर्वी पेरणीनंतर 3-5 दिवसात वापरावे. |
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share