पेरणीच्या 1 ते 5 दिवसांत बटाटा पिकांमध्ये तण व्यवस्थापन

Weed Management in Potato Crop 1-5 Days of Sowing
  • बटाट्याचे पीक हे मुख्य रब्बी पीक आहे, पावसाळ्यानंतर उर्वरित जमिनीत जास्त ओलावा असल्याने बटाटा पिकांची पेरणी झाल्यावर तण मोठ्या प्रमाणात वाढू लागते.

  • वेळेवर आणि योग्य तणनाशकाचा वापर करून सर्व प्रकारच्या तणांवर नियंत्रण ठेवता येते.

  • रासायनिक पध्दत: – या पद्धतीत रसायनांचा वापर करून तणनियंत्रण केले जाते. वेळोवेळी या रसायनांचा वापर करून तण खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित केले जाऊ शकते.

  • पेरणीनंतर 1 ते 3 दिवसानंतर: – तणनियंत्रणाच्या रासायनिक नियंत्रणासाठी पेरणीच्या 1 ते 3 दिवसानंतर पेंडमीथेलिन 38.7% सी.एस. 700 मिली / एकरी दराने फवारणी करावी.

  • अशा प्रकारे फवारणीमुळे पेरणीच्या सुरुवातीच्या काळात उगवलेल्या तणांवर नियंत्रण ठेवता येते.

  • पेरणीनंतर दुसरी फवारणी: – मेट्रीबुझिन 70 % डब्ल्यू.पी. 100 ग्रॅम प्रति एकरी 3 ते 4 दिवसानंतर किंवा बटाटा रोप 5 सें.मी.तयार होण्यापूर्वी फवारणी करावी.

  • तणनाशकांची फवारणी करताना पुरेसा ओलावा असणे फार महत्वाचे आहे.

Share