Control of Verticillium wilt in cotton

कापसातील व्हर्टिसिलिअम मररोगाचे नियंत्रण

  • सहा वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी (6-7 इंच) करून शेत समतल करावे.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरावी.
  • पेरणीपुर्वी ट्रायकोडर्मा विरिडी @ 2 किलो प्रति एकर या प्रमाणात 40- 50 किलो शेणखतात घालून जमिनीत मिसळावी.
  • कार्बोक्सीन 37.5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @ 5 ग्रॅम/किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • ट्रायकोडर्मा विरिडी @ 1 किलो + सूडोमोनास फ्लोरोसेंसे @ 1 किलो चे मिश्रण 200 लीटर पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करावे.
  • माइकोरायझा @ 4 किलो प्रति एकर 15 दिवसांच्या पिकात भुरभुरावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/ एकर फवारावे.
  • बोंडे निर्माण होताना प्रोपिकोनाज़ोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे किंवा
  • कासुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 46% WP @ 300 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Verticillium wilt of cotton

कापसातील व्हर्टिसिलिअम मररोगाची लक्षणे

  • सुरवातीच्या अवस्थेत संक्रमित रोपांवर गंभीर स्वरूपाचा प्रभाव पडतो.
  • पानांच्या शिरा काश्याच्या रंगाच्या होतात.
  • शेवटी पाने सुकून जातात आणि करपल्यासारखी दिसतात.
  • या पातळीवर जी विशिष्ट लक्षणे दिसतात त्यांना “टायगर स्ट्राइप” किंवा “टायगर क्लॉ” असे म्हणतात.
  • ग्रस्त पाने गळून पडतात आणि रोगाची लक्षणे खोड आणि मुळांवर दिसतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share