Transplanting Precautions in Chilli

मिरचीचे पुनर्रोपण करताना बाळगण्याची सावधगिरी

  • मिरचीची लागवड जुलै – सप्टेंबर या काळात केली जाते.
  • ऑगस्ट महिना मिरचीच्या लागवडीस सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबर महिना उत्तम असतो.
  • पुनर्रोपणापूर्वी 5-7 दिवस टेबुकोनाझोल वापरुन फवारणी किंवा ड्रेंचिंग केल्याने आर्द्र गलनाची समस्या येत नाही. पुनर्रोपणापूर्वी रोपांच्या मुळांना मायकोराइजाच्या द्रावणात (100 ग्रॅम/ 10 लीटर पाणी) बुडवावे.
  • रोपातील अंतर (दोन ओळीत X दोन रोपात – 3.5-5 फुट X 1-1.5 फुट अनुक्रमे) योग्य प्रमाणात ठेवावे.
  • शेतात किडीचा तीव्र उपद्रव झाल्यास कार्बोफुरॉन 3G @ 8 किलो/ एकर या प्रमाणात भुरभुरावे. रोपे सुकत असल्यास ट्रायकोडर्मा 4 किलो/ एकर या प्रमाणात भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share