ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा चांगला मित्र आहे ज्याच्या मदतीने शेतीची मोठी कामे कमी वेळेत पूर्ण केली जातात. मात्र याबाबतीत नेहमीच शेतकरी संभ्रमात असतात की, त्यांनी कोणता ट्रॅक्टर खरेदी करावा? म्हणूनच आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की, 2022 मधील टॉप 5 ट्रॅक्टर कोणते आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत.
महिंद्रा ट्रॅक्टर
भारतीय शेतकऱ्यांमध्ये महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर खूप प्रसिद्ध आहेत. या अंतर्गत 15-75 एचपी पर्यंतच्या ट्रॅक्टरच्या विविध मॉडेल्ससह MAHINDRA JIVO 225 DI 4WD सारखे कॉम्पैक्ट ट्रॅक्टर देखील बनवते तसेच हे ट्रॅक्टर बागायतदार शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
टैफे
टैफे हा भारतातील टॉप 10 ट्रॅक्टर ब्रँडपैकी एक आहे. टैफेची सर्वात जास्त विक्री होणारा ट्रॅक्टर मॉडेल्स म्हणजे आयशर (Eicher) आणि मॅसी फर्ग्युसन (Massey Ferguson) हे आहेत. यामध्ये आयशर ट्रॅक्टर 18 ते 55 एचपी पर्यंतचे वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध करून देतात.
सोनालिका
सुप्रसिद्ध ट्रॅक्टर निर्माती कंपनी सोनालिका यांच्या ट्रॅक्टरलाही शेतकऱ्यांमध्ये खूप पसंती आहे. या कंपनीचे 20HP ते 90HP पर्यंतचे ट्रॅक्टर भारतीय बाजारपेठेत वाजवी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध होतील.
कुबोटा कृषि यंत्र भारत प्रा.लिमिटेड
ही कंपनी भारतामध्ये ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रे निर्माण करते. हे 21-55 HP दरम्यान ट्रॅक्टर तयार करते, याशिवाय ही कंपनी जागतिक दर्जाचे मिनी ट्रॅक्टर देखील बनवते.
स्रोत: कृषि जागरण
Shareकृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.