टोमॅटोमध्ये टोमेटो स्पॉटेड विल्ट वायरस रोगाचे प्रतिबंधक उपाय

Tomato Spotted Wilt Virus in Tomato
  • शेतकरी बंधूंनो टोमॅटोमधील टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस [टोस्पो] थ्रिप्सद्वारे पसरतो.
  • टोमॅटोच्या कोवळ्या पानांवर जांभळे, तपकिरी डाग ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत नंतर हे तपकिरी डाग एकत्र येऊन मोठ्या डागांमध्ये/रिंगांमध्ये बदलतात आणि पानांच्या ऊतींचा नाश करू लागतात.
  • अधिक संक्रमण जल्यानंतर टोमॅटोची फळे अर्धी पिकलेली राहतात. 
  • अर्धी पिकलेल्या फळांवर हलके पिवळे ठिपके दिसतात. शेवटी, हे डाग हळूहळू मोठ्या डागांमध्ये बदलतात.
  • व्हायरस नियंत्रणासाठी, थ्रिप्सचे प्रतिबंध खूप महत्वाचे आहे. यासाठी फिप्रोनिल 5% एससी 400 मिली लैम्ब्डा साइहलोथ्रिन 4.9% सीएस 200 मिली स्पिनोसेड 45% एससी 5 मिली एकर या दराने फवारणी करावी. 
  • जैविक उपचार म्हणून ब्यूवेरिया बेसियाना 250 ग्रॅम प्रती एकर या दराने फवारणी करावी. 
Share