या आहेत जगातील सर्वात महाग भाज्या, जाणून घ्या त्यांचे फायदे

These are the world's most expensive vegetables

भाज्या या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेले पोषक तत्व. बहुतेक भाज्यांबद्दल तुम्हाला माहीतच आहे परंतु आजच्या लेखात आपण अशा भाज्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा जगातील सर्वात महाग भाज्यांमध्ये समावेश आहे.

ला बोनेट बटाटा: हा जगातील सर्वात महाग बटाटा आहे. याची शेती रेतीली मातीमध्ये होते आणि त्याची चव किंचित खारट असते, तर प्युरी, सॅलड, सूप आणि क्रीम इत्यादी बनवण्यासाठी वापरली जाते.

हॉप शूट: ही जगातील सर्वात महागड्या भाज्यांपैकी एक आहे आणि त्याची किंमत प्रति किलो 1000 युरो म्हणजेच 80,000 रुपये प्रति किलो आहे आणि या भाजीपासून बीअर बनवली जाते.

यामाशिता पालक: हे पालकासारखे दिसते आणि प्रामुख्याने फ्रान्समध्ये त्याची शेती केली जाते. एक यामाशिता पालकाची किंमत 13 अमेरिकी डॉलर एवढी असते.

मैंग चपटा मटर: ही भाजी मटारसारखीच असते. पश्चिमी देशांमध्ये ही सर्वात लोकप्रिय भाज्यांपैकी एक मानली जाते. ही 2 यूरो प्रति 100 ग्रॅम या दराने मिळते.

ताईवानी मशरूम: हा मशरूम देखील सर्वात महाग भाज्यांपैकी एक आहे.हा प्रति एक पीस 80,000 किंमतीला मिळतो आणि हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

गुलाबी पत्ताकोबी: कोबीसारख्या दिसणार्‍या या भाजीमध्ये अनेक फायदेशीर पोषक घटक आढळतात. इटली आणि दक्षिण फ्रान्सच्या वेरोना प्रदेशात याची शेती केली जाते. त्याची किंमत सुमारे 10 अमेरिकी प्रति पाउंड इतकी आहे.

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share