मक्यातील तणाचे नियंत्रण
- एट्राजीन 50% डब्लू.पी. @500 ग्रॅम/ एकर 200 लीटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी अंकुरणापूर्वी वापरावे.
- पेरणीनंतर 20-25 दिवसांनी किंवा 4-5 पाने फुटल्यावर 2,4-D डायमेथाइल अमीन सॉल्ट 58% एस.एल.@ 600 मिली/ एकरचे द्रावण फ्लॅट पॅन नोझलने फवारावे.
- तणाला 4-6 पाने फुटलेली असताना टेम्बोट्रायोन 42% एससी @ 115 मिली/ एकर फवारावे.
- तणनाशकाचा वापर करताना मातीत पुरेशी ओल हवी.
- तणनाशकाचा वापर केल्यावर मातीची हलवाहलव करू नये.
- कडधान्याबरोबर पेरणी केली असल्यास एट्राजीन आणि 2,4-D वापरू नये. त्याऐवजी पेंडीमेथलीन @ 300 ग्रॅम/ एकर अंकुरणापूर्वी पेरणीनंतर 3-5 दिवसात वापरावे. |
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share