मिरची मध्ये शोषक कीड समस्या आणि निराकरण

मिरचीच्या पिकातील रस शोषणार्‍या किडीची समस्या आणि त्यावरील उपाय

मिरचीच्या पिकात मावा, तुडतुडे आणि तेलकिडे अशा रस शोषणार्‍या किड्यांची लागण ही मुख्य समस्या असते. ही कीड मिरचीच्या पिकात रोपांचा हिरव्या भागातून रस शोषून हानी करते. त्यामुळे पानांची सुरळी होते आणि ती गळतात. रस शोषणार्‍या किडीच्या संक्रमणाने बुरशी आणि विषाणूजन्य रोग फैलावण्याची शक्यता असते. त्यामुळे या किडीचा वेळेत बंदोबस्त करावा:-

नियंत्रण:-

  • प्रोफेनोफोस 50% EC @ 400 मिली/ एकर किंवा
  • अ‍ॅसीफेट 75% SP @ 250 ग्रॅम/ एकर किंवा
  • लॅम्ब्डा सायहेलोथ्रिन 4.9% CS @ 200-250 मिली/ एकर किंवा
  • फिप्रोनिल 5% SC @ 300-350 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.

अधिक माहितीसाठी 1800-315-7566 या आमच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

What and When spraying in cotton ?

कापसात कोणती फवारणी केव्हा करावी

सर्व शेतकरी बंधूंचे कापसाचे पीक सुमारे 35-45 दिवसांचे झाले आहे आणि आता शेतकरी बंधु पावसानंतरच्या पहिल्या फवारणीची तयारी करत आहेत. कापसात पुढीलप्रमाणे फवारणी करण्याचा सल्ला ग्रामोफोन देते:

  1. पहिली फवारणी पेरणीनंतर 20-30 दिवसांनी:- इमिडाक्लोप्रिड 8% SL @ 100-120 मिली + 19:19:19 @ 1 किलो किंवा विपुल @ 250 मिली + कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% WP @ 400 ग्रॅम प्रति एकर. ही फवारणी रस शोषक कीड आणि बुरशीच्या सुरुवातीच्या संक्रमणापासून पिकाला वाचवते. रोपांच्या सुरुवातीच्या विकासासाठी आवश्यक पोषक तत्वे उपलब्ध होतात.
  2. दुसरी फवारणी पेरणीनंतर 40-45 दिवसांनी:- मोनोक्रोटोफॉस 36% SL किंवा अ‍ॅसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 8% SP बरोबर प्रोफेनोफॉस 40% EC + साइपरमेथ्रिन 5% EC बरोबर धनजाइम गोल्ड @ 250 मिली किंवा विपुल बूस्टर @ 300 मिली प्रति एकर या प्रमाणात मिसळून करावी. या फवारणीने सर्व किडीच्या अळ्या आणि अंड्यांचे नियंत्रणकरता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Problems and solutions of sucking pest in chilli:-

मिरचीमधील रस शोषणार्‍या किडीची समस्या आणि त्यावर उपाय

मिरचीच्या पिकात मावा, तुडतुडे आणि तेलकिड्यासारख्या रस शोषणार्‍या किडीचा प्रादुर्भाव ही मुख्य समस्या असते. ही किड मिरचीच्या पिकातील हिरव्या भागातून रस शोषून हानी करते. त्यामुळे पाने मुडपतात आणि गळून जातात. रस शोषक किडीच्या संक्रमणाने बुरशी आणि विषाणूजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे किडीचे वेळेत नियंत्रण करणे आवश्यक आहे:-

नियंत्रण:

प्रोफेनोफॉस 50% EC @ 400 मिली/ एकर किंवा

अ‍ॅसीफेट 75% SP @ 250 ग्रॅम/ एकर किंवा

लॅम्ब्डा सायहेलोथ्रिन 4.9% CS @ 200-250 मिली/ एकर किंवा

फिप्रोनिल 5% SC @ 300-350 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.

अधिक माहितीसाठी आमच्या 1800-315-7566 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

For the next 10 days, what will be the preparation of chillies

पुढील दहा दिवसात मिरची उत्पादक शेतकर्‍यांनी काय तयारी करावी

शेतकरी बंधूंनी मिरचीच्या नर्सरीत बियाणे पेरून सुमारे 8-10 दिवस झाले आहेत. आता पुढील 10 दिवसात नर्सरी आरोग्यापूर्ण राखण्यासाठी शेतकरी बंधूंनी पुढील कामांचे नियोजन करावे:

  • पहिली फवारणी:- पेरणीनंतर 10-12 दिवसांनी थियामेथोक्साम 25% डब्ल्यूजी 8 ग्रॅम/पम्प + अमिनो अॅसिड 20 मिली/पम्प (पानातून रस शोषणार्‍या किडीच्या नियंत्रणात सहाय्यक)
  • दुसरी फवारणी:- पेरणीनंतर 20 दिवसांनी मेटलॅक्सिल-M (मेफानोक्सम) 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 30 ग्रॅम/ पम्प + 19:19:19 @100 ग्रॅम/ पम्प (गलन रोगाच्या नियंत्रणासाठी सहाय्यक)
  • इतर किडी आणि रोगांची लागण झाल्यास किंवा शेतीच्या संबंधात कोणतीही समस्या उद्भवल्यास आपण आमच्याशी 1800-315-7566 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of sucking pest in Bottle gourd by neem-based products

निंबोणी आधारित उत्पादनांनी दुधी भोपळ्यातील रस शोषणार्‍या किडीचे नियंत्रण

  • तेलकिडे (थ्रिप्स), मावा, शल्य कीड (स्केल्स), तुडतुडे आणि श्वेत माशी अशा लहान, मुलायम शरीराच्या किडे आणि माश्यांच्या विरोधात निंबोणीचे तेल सर्वाधिक प्रभावी असते.
  • पेरणीच्या वेळी आणि 30 दिवसांनी निंबोणीची पेंड @ 40 किग्रॅ प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळावी.
  • 10 दिवसांच्या अंतराने PNSPE (4%) किंवा निंबोणी/ पोंगामिया साबणाच्या द्रावणाची (8-10 ग्रॅम/ लीटर) फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share