ड्रिप (ठिबक) आणि स्प्रिंकलर सिस्टमवरती 55% अनुदान मिळवा, लवकर अर्ज करा

मध्य प्रदेश सरकारकडून सूक्ष्म सिंचन पद्धतीवर सब्सिडी दिली जात आहे. जेणेकरुन जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. म्हणूनच ड्रिप (ठिबक) आणि स्प्रिंकलर पद्धतीने ही सब्सिडी दिली जात आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दराने सब्सिडी देण्याची तरतूद केलेली आहे.

  • लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्प्रिंकलर सेटच्या किमतीच्या 55% पर्यंत अनुदान दिले जाईल. त्याचबरोबर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 45% पर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे.

  • त्याचप्रमाणे ड्रिप (ठिबक) सिंचन प्रणालीच्या खरेदीवर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 45% पर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे.

या योजनेसाठी असणारी अर्ज प्रक्रिया 20 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे, जी 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://mpfsts.mp.gov.in/mphd/#/ वर जाऊन विविध सिंचन प्रणालींसाठी असणारी नोंदणी करू शकता. त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी लॉटरीच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

स्रोत: किसान समाधान

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share