Use of wheat and gram sawdust/straw

गहू आणि हरबर्‍याच्या तूस/ भुश्याचा वापर

  • भुस्सा म्हणजे उत्पादनातून धान्याला वेगळे काढल्यानंतर उरणारे अवशेष असतात.
  • त्याचा खत बनवण्यासाठी, मल्चिंगसाठी, नर्सरी बनवताना अशा अनेक प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो. तसेच तो मातीची जैविक क्षमता वाढवण्यासाठी महत्वपूर्ण असतो.
  • गव्हाचा भुस्सा/ तूस मशरूम उत्पादनासाठी उपयुक्त असतो.
  • गहू आणि हरबर्‍याच्या भुश्याचा वापर शेणखत बनवतानाही केला जातो. तसेच गोवर्‍या बनवताना त्याला शेणात मिसळले जाते.
  • कुक्कुटपालनासारख्या कृषि उद्योगात त्याला पृष्ठभाग कोरडा ठेवण्यासाठी आणि तापमान नियंत्रित करण्यासाथू पसरले जाते.
  • गव्हाच्या भुस्सा/ तुसाचा वापर पशु आहारात देखील केला जातो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Disadvantages of burning Sawdust/Chaff/Straw

पिकाचे अवशेष/ भुस्सा /तूस जाळल्याने होणारे नुकसान

  • मोकळ्या जागेत पिकाच्या अवशेषांना जाळल्याने होणारे वायू प्रदूषण होते आणि वायूची गुणवत्ता आणि मानवी आरोग्यावर दुष्परिणाम हा चिंतेचा विषय आहे.
  • मातीतील पोषक तत्वे आणि मातीतील सूक्ष्मजीवांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो.
  • आगींमुळे शेतात आणि बाहेर गंभीर वायू प्रदूषण होते. शेतीच्या परिरसातील धूर आणि प्रदूषित हवेमुळे लोकांवर दुष्परिणाम होतो आणि शेतांपासून शेकडो किलोमीटर दूरपर्यंत धूर पसरतो.
  • शेतात भुस्सा जाळल्याने मातीतील आर्द्रता घटते आणि मातीच्या आरोग्याला हानी पोहोचते.
  • भुस्सा जाळल्याने CO2 गॅस निर्माण होतो. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणातील बदलात वाढ होते.
  • काही वेळा आग अनियंत्रित होते. त्यामुळे भारी नुकसान होऊ शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share