काकडीच्या पिकातील तणाचे नियंत्रण
- पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवणे आवश्यक असते.
- वेळी शेतभर पसरतात तेव्हा निंदणी करण्याची आवश्यकता नसते.
- सामान्यता पिकातील पहिली आणि दुसरी निंदणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी आणि त्यानंतर 45-50 दिवसांच्या अंतराने करतात.
- मांडव किंवा आधार दिलेल्या काकडीच्या शेतात सर्व प्रकारची पाने असलेल्या तणासाठी पॅराक्वाट डायक्लोराइड 24% एस.एल.( ग्रामोक्सोन ) किंवा ग्लायफोसेट 41% एसएल @ 1 लीटर/ एकर ओळींच्या मध्ये हुड लावून फवारावे. हे नॉन सिलेक्टिव तणनाशक असल्याने हुड लावणे आवश्यक आहे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share