एस.बी.आय.ने नवीन सेवा सुरू केली, 75 लाख शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे

SBI launches new service, 75 lakh farmers will get benefit from it

भारतीय स्टेट बँकेने शेतीशी संबंधित कामे सुलभ करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड पुनरावलोकन सेवा योनो ॲपमध्ये सुरू केली आहे. या सेवेद्वारे शेतकरी आता घरातच बसून त्यांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकतात आणि त्यासाठी त्यांना बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.

एसबीआयने या विषयाची माहिती दिली आणि असे सांगितले की, “आता केसीसीची मर्यादा बदलण्यासाठी शेतकऱ्यांना कागदी कामे करण्याची गरज भासणार नाही.” या सेवेद्वारे शेतकरी ऑनलाइन जाऊन केसीसीची मर्यादा बदलू शकतात. एस.बी.आय. अधिकाऱ्यांच्या मते ही सेवा सुरू झाल्याने, देशातील 75 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे.

स्रोत: जागरण

Share