बिहारच्या मुजफ्फरपुरमधील कटरा थाना परिसरातील एक वृद्ध शेतकरी रामबहादुर शाह शेती करून आपले जीवन जगत आहे. गेल्या काही दिवसात त्यांच्या बँक खात्यात अचानक 52 कोटी रुपये आले. रामबहादुरच्या मुलाने म्हणजेच सुजितने सांगितले की “आमच्या वडिलांच्या खात्यात 52 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आली आहे. ज्याची आम्हा सर्वांना खूप काळजी वाटत आहे.
खरं तर, रामबहादुर शाह अलीकडेच एका सीएसपी ऑपरेटरकडे त्याच्या वृद्धापकाळातील पेन्शन रक्कम शोधण्यासाठी गेले होते त्या दरम्यान त्याचे खाते तपासले गेले तेव्हा त्यांच्या खात्यात 52 कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याचे पाहून सीएसपी ऑपरेटरला धक्का बसला.