मध्य प्रदेश सरकार 5 लाख शेतकर्यांना नवीन भेट देणार आहे. मुख्यामंत्री किसान कल्याण योजनेअंतर्गत ही भेट देण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत 5 लाख शेतकर्यांच्या खात्यात 100 कोटी रुपये पाठविले जातील.
या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 2-2 हजार रुपयांची रक्कम पाठविली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वतः ट्वीट वरून या योजनेची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेअंतर्गत आज राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 100 कोटी रुपये जमा केले जात आहेत आणि हे असेच सुरू राहणार असून याचा सुमारे 80 लाख शेतकर्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचे सरकार सतत उभे करत रहाणे आवश्यक आहे, आणि आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.
स्रोत: प्रभात खबर
Share