भेंडीच्या पिकतील किडीचे नियंत्रण
अंकुर आणि फळे पोखरणारी कीड:-
- 13 ते 15 मिमी लांब वाढ झालेले किडे मध्यम आकाराचे पतंग असात. त्यांचे डोके आणि थोरैक्स पांढर्या रंगाचे असते.
- नियंत्रण: – संक्रमित फळे नियमितपणे तोडून नष्ट करावीत.
- कार्बोसल्फान 25% EC @ 400 मिली/ एकर किंवा बायफेंथ्रीन 10% EC @ 400 मिली/ एकर किंवा मेथोमाइल 40% SP @ 400 ग्रॅम/ एकय या प्रमाणात फवारावे.
श्वेत माशी:-
- शिशु आणि वाढ झालेले किडे अंडाकार हिरवट पांढर्या रंगाचे असतात.
- वाढ झालेले किडे सुमारे 1 मि.ली. लांब असतात आणि त्यांच्या शरीरावर पांढरे मेणचट आवरण असते.
- नियंत्रण: – अॅसफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.8% SP @ 200 ग्रॅम/ एकर फवारावे.
- अॅसिटामिप्रिड 20% SP @ 100 -150 ग्रॅम/ एकर किंवा
- थियामेथोक्साम 25% WG @ 80 ग्रॅम/ एकर
लाल कोळी:-
- लाल कोळी पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर वसाहत बनवतात.
- लाल कोळ्याचे शिशु आणि वाढ झालेले किडे रोपातून रस शोषतात त्यामुळे पानांवर पांढरे डाग पडतात.
- लाल कोळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रॉपरगाइट 57% EC @ 400 मिली/ एकर फवारावे.
- स्पिरोमॅन्सिफेन 22.95% w/w @ 300 मिली/ एकर किंवा
- अॅबामॅक्टिन 1.8% EC @ 60-100 मिली/ एकर
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share