- रोग झालेली पाने खुडून नष्ट करावीत.
- रोगाला प्रतिबंध करणाऱ्या वाणाच्या बियांचे रोपण करावे.
- आळीपाळीने पिके घेणे आणि स्वच्छता ठेवणे या उपायांनी रोगाची तीव्रता कमी होते.
- थायोफ़ॅनेट मिथाईल ७०% WP एकरी ३०० ग्रॅम फवारावे.
- मेटलक्सिल ८% + मॅंकोझेब ६४% WP एकरी ५०० ग्रॅम फवारावे.
भोपळ्याच्या पिकावरील केवडा (तांबडी भुरी) रोग कसा ओळखावा
भोपळ्यावरील केवडा किंवा तांबडी भुरी रोगाची प्रमुख लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.
- पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पाण्याने भिजलेले घाव दिसतात.
- घाव आधी जुन्या पानांवर दिसतात आणि नंतर कोवळ्या पानांवर पसरत जातात.
- घाव जसजसे पसरतात तसे पिवळे राहतात किंवा सुके आणि तपकिरी होतात.
- परिणाम झालेल्या वेलींना व्यवस्थित फल धारणा होत नाही.