- कांदे आणि लसुण यांच्या दीर्घकालीन साठवणी करिता तापमान आणि सापेक्ष आर्द्रता हे महत्त्वाचे घटक आहेत.
- जुलै ते सप्टेंबर मध्ये आर्द्रता ७० टक्क्यांहून अधिक असल्यामुळे कांदे कुसण्याची शक्यता वाढते.
- तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तपमान कमी झाल्यामुळे कांद्याला मोड येण्याची समस्या वाढते.
- अधिक चांगल्या साठवणी करता कोठाराचे तापमान २५ ते ३० डिग्री सेल्सिअस असावे तर आर्द्रता ६५ ते ७० टक्के असावी.