ट्रायकोडर्मा केव्हा, कसे आणि कशासाठी वापरावे
ट्रायकोडर्मा कोबीवर्गीय पिके, कापूस, सोयाबीन अशा सर्व प्रकारच्या रोपे आणि भाज्यांसाठी आवश्यक असते.
- बीजसंस्करण: 1 किलो ट्रायकोडर्मा पावडर प्रति क्विंटल बियाणे या प्रमाणात वापरुन पेरणीपुर्वी ते द्रावण बियाण्यात मिसळावे.
- मुळांच्या उपचारासाठी: 10 किलो उत्तम प्रतीचे शेणखत आणि 100 लीटर पाण्यात मिसळून द्रावण करावे आणि त्यात 1 किलो ट्रायकोडर्मा पावडर मिसळून रोपणापूर्वी त्या मिश्रणात रोपांची मुळे 10 मिनिटे बुडवावी.
- मृदा उपचार: 4 किलो ट्रायकोडर्मा पावडर प्रति एकर या प्रमाणात 50 किलो शेणखतात मिसळून मूलभूत मात्रा द्यावी.
- उभ्या पिकात: उभ्या पिकात वापर करण्यासाठी एक लीटर पाण्यात 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळून बुडाजवळच्या मातीचे ड्रेंचिंग करावे.
खबरदारी
- ट्रायकोडर्मा वापरल्यावर 4-दिवस कोणतेही रासायनिक बुरशीनाशक वापरू नये.
- कोरड्या मातीत ट्रायकोडर्मा वापरू नये. त्याच्या वाढीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी ओल आवश्यक असते.
- संस्कारित बियाणे उन्हात ठेवू नये.
- ट्रायकोडर्मा जास्त वेळ FYM मध्ये मिसळून ठेवू नये.
अधिक माहितीसाठी आमच्या 1800-315-7566 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share