Management of Powdery mildew in Peas

मटारवरील भुरी रोगाचा प्रतिबंध:-

लक्षणे:-

  • आधी हा रोग जुन्या पानांवर दिसतो आणि नंतर रोपांच्या अन्य भागांवर पसरतो.
  • पानांच्या दोन्ही बाजूंवर भुकटी बनु लागते.
  • त्यानंतर कोवळे देठ, शेंगा इत्यादींवर भुकटीचे डाग पडतात.
  • रोपाच्या पृष्ठभागावर पांढरी भुकटी दिसू लागते. फळे लागत नाहीत किंवा लहान रहातात.
  • शेवटच्या टप्प्यात भुकटीची वाढ शेंगाना झाकून टाकते. त्यामुळे त्या विकण्यास योग्य रहात नाहीत.

प्रतिबंध:-

  • उशिरा पेरणी करू नये.
  • अर्का अजीत, PSM-5, जवाहर मटर-4, जेपी-83, जेआरएस-14 अशी रोग प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • विरघळणारे सल्फर 50% WP 3 ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून किंवा डायनोकेप 48% ईसी 2 मिली प्रति ली पाण्यातून दहा दिवसांच्या अंतराने दोन किंवा तीन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Powdery Mildew of Bottle Gourd

दुधीभोपळ्यातील भुरी (पावडर मिल्ड्यु) रोग:-

  • पानांवर पांढरे किंवा धुरकट रंगाचे डाग उमटतात आणि ते वाढून पांढर्‍या रंगाची भूकटी बनते.
  • दर 15 दिवसांनी हेक्झाकोनाझोल 5% SC 300 मिली. प्रति एकर किंवा थायोफिनेट मिथाईल 400 ग्रॅम प्रति एकरचे मिश्रण फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Powdery mildew in Tomato

हा रोग लेवीलुलाटोरिका जिवाणूमुळे होतो. सुरूवातीला पानांच्या वरील बाजूवर फिकट हिरव्या ते फिकट पिवळ्या रंगाचे डाग दिसू लागतात. पानावर भुकटीचे हलके आवरण दिसते आणि पाने पिवळी पडू व कुजू लागतात. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी हेक्साकोनोजोल 5% एससी @ 30 मिलीलीटर / 15 लीटर पाणी किंवा सल्फर 80% डब्लूडीजी @ 50 ग्रॅम / 15 लीटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share