कुक्कुटपालन करण्यासाठी मिळणार 1 करोड रुपये, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या आणि व्यवसाय सुरू करा

poultry farming loan scheme

अनेक शेतकरी शेतीबरोबरच पशुपालन किंवा कुक्कुटपालनासारखी कामेही करतात आणि चांगले उत्पन्न मिळवतात, त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांना या क्षेत्रांत पुढे जाण्यास प्रवृत्त करत आहे. सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून पशुपालन, कुक्कुटपालन इत्यादींना देखील प्रोत्साहन देत आहे. जर तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला सरकारी मदत मिळते त्यामुळे तुम्ही या कामाची सुरुवात सहजपणे करू शकता.

उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन कर्ज योजना चालविली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देखील मिळू शकते आणि हे कर्ज शेतकऱ्यांना सब्सिडीवर उपलब्ध करून दिले जाते म्हणजेच याचा अर्थ असा की, काही रक्कम शेतकऱ्यांनया द्यावी लागते आणि उर्वरित बाकी रक्कम सरकार बँकेतून देते.

याअंतर्गत सुमारे 30 हजार पक्ष्यांच्या व्यावसायिक युनिटव्यतिरिक्त 10 हजार पक्ष्यांचे युनिट स्थापन करण्यात आले आहे. 30 हजार पक्षी असलेल्या युनिटसाठी 1.60 कोटी, त्यापैकी 54 लाख रुपये शेतकऱ्याला दिले आहेत आणि उर्वरित 1.06 कोटी रुपये बँकेला कर्ज म्हणून प्राप्त झाले आहेत. हे कर्ज तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, फेडरल बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेकडून मिळवू शकता.

स्रोत: कृषि जागरण

कृषी क्षेत्राच्या अशा नवनवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी ग्रामोफोन अ‍ॅपचे लेख दररोज वाचत राहा आणि हा लेख खाली दिलेल्या शेअर बटणावर क्लिक करून तुमच्या मित्रांसह शेअर करा.

Share