How to maintain healthy chilli nursery

मिरचीच्या नर्सरीला कसे निरोगी ठेवावे

एक मुख्य समस्या :- आर्द्र गलन

  • आर्द्र गलन रोगाची लक्षणे नर्सरीच्या सुरुवातीच्या दिवसातच दिसतात.
  • आर्द्र गलन रोगाचा प्रभाव कधीकधी बियाण्यावर देखील पडतो. माती खोदल्यास मऊ पडलेल्या आणि सडलेल्या बिया दिसतात.
  • नर्सरीतील रोपाच्या खोडावर पाणी भरलेले डाग पडतात आणि खोड काळपट दिसते. शेवटी रोप आकसून मरते.

या रोगाच्या संक्रमणासाठी पोषक परिस्थिती:-

  1. ओलीचे प्रमाण (90-100%)
  2. मातीचे तापमान (20-28°C)
  3. पाण्याच्या निचर्‍यासाठी योग्य व्यवस्था नसणे

नियंत्रण:-

  • पाण्याचा उत्तम निचर्‍यासह योग्य अंतर ठेवून सिंचन करावे.
  • नर्सरी वाफे तैय्यार करताना 0.5 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात थियोफैनेट मिथाइल मातीत मिसळावे.
  • रोगाचा तीव्र हल्ला झाल्यास 20 दिवसांनी मेटालॅक्सिल-एम (मेफानोक्सम) 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यू पी 500 ग्रॅम/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share