महिलांना सशक्त बनविण्यासाठी अनेक योजना चालू आहेत. अशीच एक योजना म्हणजे, पीएनबी महिला उद्यमी निधी योजना जी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रेरित करत आहे.
या योजनेत कमी व्याज दर आणि कमी अटींवरती कर्ज दिले जाते. या योजनेतून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते. या कर्जाचा वापर नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि अगोदर अस्तित्वात असलेला व्यवसाय वाढविण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
या योजनेतून घेतलेले कर्ज 5 ते 10 वर्षांनंतर परत करावे लागते. या योजनेमध्ये फक्त महिलाच अर्ज करू शकतात आणि लाभार्थी महिलेची व्यवसायात 51% मालकी असणे आवश्यक आहे.
स्रोत: कृषी जागरण
Share