प्रधानमंत्री किसान सम्मान निधीच्या 12 व्या हप्त्याची शेतकरी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपयांची रक्कम ही पाठवली जाऊ शकते. मात्र, अनेक वेळा असे दिसून आले आहे की, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा स्टेटस चेक करण्यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला स्टेटस चेक करण्याचा सोपा मार्ग दाखवत आहे.
पीएम किसान योजनेचा स्टेटस अशा प्रकारे चेक करा?
सरकारने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक टोल फ्री नंबर 155261 जारी केला आहे. या टोल फ्री नंबरवर कॉल करून शेतकरी लाभार्थी यादीमध्ये आपले नाव, केवायसीची संपूर्ण प्रक्रिया तसेच बँक खात्यात जमा केलेल्या रकमेची संपूर्ण माहिती प्राप्त करू शकतात. याशिवाय पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर देखील आपल्या स्टेटसची माहिती प्राप्त करू शकतात.
केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. ही मदत रक्कम तीन हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये याप्रमाणे दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत. तर शेतकरी आता पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
स्रोत: कृषि जागरण
Shareकृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.