किसान सन्मान निधीचा घेत आहेत चुकीचा लाभ, त्यामुळे लवकरात लवकर सावध व्हा?

देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार ‘पीएम किसान सन्मान योजना’ चालवित आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर होतात, ज की शेतकऱ्यांना  4 महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेद्वारे देशातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपयांचे 11 हप्ते पाठवले आहेत. मात्र, असे निदर्शनास आले आहे की, काही असे लोक आहेत की, जे या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत. जे आधीच आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. अशी प्रकरणे समोर आल्यानंतर सरकारने कठोर पावले उचलली आहेत. अशा लाभार्थ्यांकडून लवकरात लवकर संपूर्ण रक्कम काढून घेतली जाईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे.

रिपोर्ट्सनुसार, असे काही लोक आहेत जे टॅक्स जमा करण्यासोबतच पीएम किसान सन्मान योजनेचाही लाभ घेत आहेत. अशा लोकांपासून वसूली करण्यासाठी आता सरकारने नोटिस जारी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर योजनेचे संपूर्ण पैसे परत न केल्यास सरकारकडून कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यासाठी पीएम किसान पोर्टलवर पैसे परत करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

स्रोत: आज तक

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share