Sowing time, Planting and Seed Rate of Garlic

लसूणच्या लागवडीसाठी योग्य वेळ, लागवड करण्याची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण:-

  • मध्य भारतात पाकळ्यांचे रोपण सप्टेंबर-नोव्हेंबर या काळात केले जाते.
  • लसूणच्या पाकळ्या गाठींपासुन वेगळ्या करण्याचे काम पेरणीच्या वेळीच करावे.
  • पाकळ्यांचे साल निघाल्यास त्या पेरणीस उपयुक्त राहत नाहीत.
  • ज्यांची प्रत्येक पाकळी कडक आणि सुट्टी आहे असा कडक मानेचा गड्डा पेरणीस उपयुक्त असतो.
  • मोठ्या पाकळ्या (1.5 ग्रॅमहून मोठ्या) निवडाव्यात. छोट्या, रोगग्रस्त आणि क्षतिग्रस्त पाकळ्या काढाव्यात.
  • लसूणच्या बियाण्याचे प्रमाण 400-500 किलो प्रति हे.
  • निवडलेल्या पाकळ्या 2 सेमी. खोल 15 X 10 सेमी. अंतरावर पेराव्यात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Season of Planting of Potato in Northern Plains

उत्तरेच्या मैदानी भागात बटाट्याची लागवड करण्यासाठी सुयोग्य वेळ:-

सहसा बटाट्याचे पीक जेथे तापमान 18°C हून अधिक नसते अशा थंड वातावरणाच्या प्रदेशात घेतले जाते. बटाट्याच्या पिकाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तापमान 15-25°C च्या दरम्यान असावे.

उत्तरेच्या मैदानी भागात बटाट्याची लागवड आणि काढणी करण्यासाठी सुयोग्य वेळ:-

क्र. . हंगाम लागवडीची वेळ काढणीची वेळ
1. लवकर सप्टेंबर-ऑक्टोबर डिसेंबर – जानेवारी
2. मध्य ऑक्टोबर -नोव्हेंबर फेब्रुवारी-मार्च
3. उशिरा डिसेंबर-जानेवारी मार्च-एप्रिल

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share