पिकातील बोरॉनच्या अभावाची लक्षणे आणि बचावाचे उपाय
- वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये बोरॉनच्या अभावाची वेगवेगळी लक्षणे दिसतात. सामान्यता त्याची लक्षणे नवीन पानांवर दिसतात.
- बोरॉनच्या अभावाने नवीन पाने जाड आणि रंगविहीन होतात.
- बोरॉनच्या तीव्र अभावाने रोपाचा शेंडा गळू लागतो. अनेक पिकात फळे गळणे बोरॉनच्या अभावाचे लक्षण असते.
- बोरॉनचा अभाव सामान्यता अधिक pH स्तर असलेल्या मातीत आढळून येतो कारण अशा मातीत बोरॉन पुरेशा प्रमाणात असले तरी रोपांना मिळत नाही.
- कमी कार्बनिक पदार्थ असलेली माती (<1.5%) किंवा रेताड माती (जिच्यातील पोषक तत्वे विरचनाने नष्ट होतात) यांच्यातही बोरॉनचा अभाव असतो.
बोरॉनच्या अभावापासून बचावाचे उपाय:-
- जास्त pH स्तर असलेल्या मातीत पीक पेरु नये.
- कोरड्या मातीत जास्त दमट वातावरण बोरॉनची उपलब्धता कमी करते.
- प्रमाणाबाहेर उर्वरके आणि चुना वापरू नये.
- जास्त सिंचन करू नये.
- मातीचे नियमित परीक्षण करून आपल्या शेतातील पोषक तत्वांच्या पातळीबाबत पूर्ण माहिती मिळवत राहावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share