ऑपरेशन ग्रीन अंतर्गत 500 कोटींची तरतूद, कोणत्या शेतकऱ्यांना होणार फायदा?

Provision of 500 crores under Operation Green, know which farmers will benefit

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांची घोषणा केली होती. या मोठ्या पॅकेजचा एक मोठा भाग कृषी क्षेत्रात वापरला जाणार आहे, ज्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. या भागांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, ऑपरेशन ग्रीनला आणखी प्रोत्साहन दिले जाईल.

टोमॅटो, कांदे आणि बटाटे या योजनेअंतर्गत येत असत, परंतु आता इतर सर्व फळे आणि भाज्यादेखील त्याखाली आणल्या जातील. यांशिवाय या योजनेसाठी 500 कोटींची तरतूदही करण्यात येणार असून, यामुळे अनेक शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल.

या योजनेमुळे नाशवंत अन्नपदार्थाचा बचाव होईल आणि त्याच वेळी प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना पिके कमी किंमतीला विकावी लागणार नाहीत. या योजनेंतर्गत सर्व फळे व भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50% आणि साठवणुकीत 50% अनुदान देण्यात येणार आहे.

Share