Damping off disease in Onion

कांद्याच्या रोपांचा आंद्र गलन रोग:- विशेषता खरीपाच्या हंगामातील जमिनीतील अतिरिक्त ओल आणि मध्यम तापमान या रोगास मुख्य पोषक आहेत. या रोगात कांद्याची रोपे सडून मरतात.

नियंत्रण – कार्बेन्डाझिम12% + मॅन्कोझेब 63% किंवा थियोफीनेट मिथाइल 70% WP 50 ग्राम प्रति पम्प फवारावे.

Share

Doses of Fertilizer and Manure in Onion Crop

कांद्याच्या पिकासाठी उर्वरकांची मात्रा

  • कांद्याची चांगल्या उत्पादनासाठी उर्वरकांची अधिक आवश्यकता असते.
  • रोपण केल्यावर एका महिन्यात शेणखताची 8-10 टन प्रति एकर मात्रा द्यावी.
  • नायट्रोजन 50 किलो/एकर, फॉस्फरस 25 किलों प्रति एकर आणि पोटाश 30 किलो /एकर
  • रोपणापूर्वी नायट्रोजनची अर्धी मात्रा आणि फॉस्फरस आणि पोटाशची पूर्ण मात्रा मातीत मिसळावी.
  • रोपणानंतर 20-25 दिवसांनी नायट्रोजनची दुसरी आणि 45-60 दिवसांनी तिसरी मात्रा द्यावी.
  • झिंक सल्फेटची 10 किलो/एकर आणि बोरॉनची 4 किलो/एकर मात्रा उत्पादन वाढवते आणि कंदांची गुणवत्ता सुधारते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Bulb splitting In Onion (physiological Disorder)

कांद्याचे कंद फुटणे:

कारणे:-

  • कांद्याच्या शेतातील अनियमित सिंचनाने या रोगात वाढ होते.
  • शेतात अतिरिक्त पाणी सोडल्यावर त्याला पुर्णपणे वाळू दिले आणि त्यानंतर पुन्हा अतिरिक्त पाणी सोडल्यास कंद फुटतात.
  • रायझोफ़ायगस प्रजातीचे कोळी चिकटणे हे कंद फुटण्याचे कारण आहे.

लक्षणे:-

  • कंद फुटण्याची लक्षणे आधी कंदाच्या तळात दिसतात.
  • प्रभावित कंदाच्या तळात उंचवटा आल्याचे स्पष्ट आढळून येते.

नियंत्रण:-

  • एकसमान सिंचन आणि उर्वरकांच्या सुयोग्य मात्रेचा वापर करून कंद फुटणे रोखता येते.
  • हळूहळू विकसित होणार्‍या कांद्याच्या वाणांचा वापर करून या विकाराचे नियंत्रण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Bolting in Onion (Physiological disorder)

कांद्याला फुलोरा येणे (बोल्टिंग) (क्रियात्मक विकार)

कारणे:-

  • वेगवेगळ्या वानांच्या आनुवांशिक विविधतेमुळे.
  • तापमानात मोठे चढ उतार झाल्याने.
  • बियाण्याची गुणवत्ता कमी असल्याने.
  • नर्सरी बेडवर रोपांचा विकास खुंटल्याने.
  • सुरूवातीला खूप कमी तापमान असल्यास फुलांचा विकास होतो.

लक्षणे:-

  • रोपे पाच पाने फुटल्याच्या अवस्थेत असताना ही अवस्था येते.
  • यात अचानक कांद्याच्या शिरावर कंदाच्याऐवजी गाभा तयार होतो.
  • या अवस्थेत कंद हलके आणि तंतुमय होतात.

नियंत्रण:-

  • वाणाची पेरणी सुयोग्य वेळी करावी.
  • उर्वरकांचा अतिरिक्त वापर करू नये.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Achieved Maximum Yield in Onion

कांद्याचे भरघोस उत्पन्न मिळवले

शेतकर्‍याचे नाव:- मुकेश पाटीदार

गाव:-  कनारदी

तहसील आणि जिल्हा:- तराना और उज्जैन

राज्य :- मध्य प्रदेश

शेतकरी बंधु मुकेश पाटीदार ग्रामोफोनचे आधुनिक शेतकरी आहेत. त्यांनी ग्रामोफ़ोन टीमच्या मार्गदर्शनाखाली कांद्याची शेती केली. त्याचे मध्य प्रदेशातील सरासरी उत्पादन 70 क्विंटल/ एकर आहे पण मुकेश जी ना प्रति एकर 113 क्विंटल मिळाले.

Share

Stem and bulb nematode in Onion and Garlic

 

कांदा आणि लसूणच्या खोड आणि कंदामधील सूत्रकृमी:- सूत्रकृमी रोपाच्या मुख किंवा जखमांमार्फत रोपांमध्ये प्रवेश करते आणि रोपांमध्ये गाठी किंवा रोगट वाढ निर्माण करतात. त्यामुळे बुरशी आणि जिवाणू यासारख्या माध्यमिक रोगकारकांना रोपात प्रवेश मिळतो. वाढ खुंटणे, कंद रंगहीन होणे व सूज येणे ही सूत्रकृमीच्या लागणीची लक्षणे आहेत.

उपाय:- •

  • रोगयुक्त कंद बियाण्यासाठी ठेवू नयेत.
  • शेत आणि उपकरणे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे कारण सूत्रकृमी लागण झालेल्या रोपांच्या अवशेषात जीवंत राहतात आणि पुन्हा उत्पन्न होतात.
  • सूत्रकृमींच्या चांगल्या नियंत्रणासाठी कार्बोफ्यूरॉन 3% दाणेदार @ 10 किग्रॅ / एकर जमिनीत मिसळून द्यावे.
  • सूत्रकृमींच्या के कार्बनिक नियंत्रणासाठी निंबाची पेंड @ 200 किग्रॅ / एकर जमिनीत मिसळून द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Excellent Growth of Root in Onion

कांद्याच्या मुळांची उत्तम वाढ

शेतकर्‍याचे नाव:- देवनारायण पाटीदार

गाव:- कनारदी

तहसील :- तराना जिल्हा:- उज्जैन

शेतकरी बंधु श्री देवनारायण पाटीदार जी यांनी कांद्यात 4 किलो प्रति एकर या मात्रेत मायकोरायझा (जैव उर्वरक) चा वापर ग्रामोफ़ोन टीमच्या शिफारसीमूळे केल्याने त्याचे त्यांना उत्तम परिणाम मिळाले आहेत.  मुळांचा सम्पूर्ण विकास झाल्याने रोपे निरोगी राहिली असून कंदांचा आकार देखील एकसमान आहे.

Share

Factors Affecting storage of Onion and Garlic

कांदा लसूणच्या साठवणीस प्रभावित करणार्‍या बाबी:- जातीची निवड:- सर्व जातींची साठवण क्षमता एकसारखी नसते. खरीपाच्या हंगामात केल्या जाणार्‍या जातींचे कांदे टिकाऊ नसतात तर रब्बीच्या हंगामात केल्या जाणार्‍या जातींचे कांदे साधारणत: 4-5 महीने साठवता येतात. जातींनुसार हे बदलू शकते. गेल्या 10-15 वर्षांच्या अनुभवानुसार एन-2-4-2, अ‍ॅग्रीफाउंड लार्इट रेड, अर्का निकेतन इत्यादि जाती 4-5 महीने उत्तम प्रकारे साठवता येतात. लसूणच्या जी-1. जी- 2 ,जी 50 आणि जी 323 इत्यादि जाती 6 ते 8 महिने साठवता येतात.

उर्वरक आणि पाणी व्यवस्थापन:- उर्वरकांची मात्रा, त्यांचा प्रकार आणि पाणी व्यवस्थापन यांचा कांदा लसूणच्या साठवण क्षमतेवर प्रभाव पड़तो. शेणखतामुळे साठवण क्षमता वाढते. त्यामुळे शेणखत किंवा हरित खते वापरणे आवश्यक असते. कांदा लसूणमध्ये हेक्टरी 150 किग्रॅ. नत्र, 50 किग्रॅ. फॉस्फरस आणि 50 किग्रॅ. पोटाश देण्याची शिफारस केली जाते. शक्य असल्यास सर्व नत्र कार्बनिक खतांच्या माध्यमातून द्यावे आणि नत्राची पूर्ण मात्रा रोपणींनंतर 60 दिवसात द्यावी. उशिरा नत्र दिल्यास रोपांची खोडे जाड होतात आणि कांदा टिकत नाही तसेच बुरशीजन्य रोगांची लागण अधिक प्रमाणात होते व प्रस्फुटन जास्त होते, पोटॅशियमची मात्रा 50 किग्रॅ. पासून वाढवून 80 किग्रॅ. प्रति हेक्टर करावी. अशा प्रकारे 50 किग्रॅ. प्रति हेक्टर मात्रा देण्याने कांदा आणि लसूणाची साठवण क्षमता आणि गुणवत्ता वाढते. गन्धकासाठी अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पोटॅशियम सल्फेट वापरल्याने रोपांना पुरेशा प्रमाणात गन्धक मिळते.

स्टोरेज हाऊसमधील वातावरण :- कांदा लसूणची दीर्घकाळ साठवण करण्यासाठी स्टोरेज हाऊसचे तापमान आणि अपेक्षाकृत आद्रता महत्वपूर्ण असते. अधिक आर्द्रता (70% हून अधिक) हा कांद्याच्या साठवणुकीचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे जिवाणूंचा उपद्रव देखील वाढतो आणि कांदा सडू लागतो. याउलट आर्द्रता कमी (65% हून अधिक) असल्यास कांद्यातून अधिक वाष्पोत्सर्जन होते आणि वजन घटते. चांगल्या साठवणुकीसाठी स्टोरेज हाऊसचे तापमान 25-30 डिग्री सें. आणि आर्द्रता 65-70 टक्के या दरम्यान असणे आवश्यक असते. मे-जून महिन्यात स्टोरेज हाऊसमधील तापमान अधिक असल्याने आणि आर्द्रता कमी असल्याने वजन घटते. जुलै ते सप्टेंबर या काळात आर्द्रता 70 टक्क्यांहून अधिक असल्याने सडण्याचे प्रमाण वाढते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तापमान कमी असल्यानं सुप्तावस्था मोडते आणि मोड येण्याची समस्या वाढते.

Share

Cultivation of healthy Onion Crop

कांद्याची निरोगी शेती

शेतकर्‍याचे नाव:- जगदीश लोधी

गाव:- चावनी

तहसील :- तराना, जिल्हा:- उज्जैन

शेतकरी बंधु जगदीश जी यांनी 1 एकर क्षेत्रात कांदा लावला असून ते पुर्णपणे ग्रामोफ़ोन टीमच्या मार्गदर्शनाखाली शेती करत आहेत. जगदीश भाई यांचे म्हणणे आहे की आता माला शेतीशी संबंधित सामान घरबसल्या मिळते आणि ते देखील तज्ञांच्या सल्ल्यासह. त्यामुळे माझ्या वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत आहे आणि पीक देखील पूर्वीपेक्षा निरोगी आहे. ही सुविधा शेतकर्‍यांसाठी खूप उपयुक्त आहे.

Share

Symptoms and Control of Stemphylium Blight in Onion

कांद्यावरील स्टेम्फिलियम ब्लाइट रोगाची लक्षणे आणि त्याचे नियंत्रण

स्टेमफाईटम ब्लाइट रोग:- पानांमध्ये लहान पिवळे ते नारंगी डाग किंवा रेषा उमटतात आणि वाढून जाळ्याच्या आकाराचे अंडाकृती होतात.  डागांच्या सर्व बाजूंनी गुलाबी कडा असणे हे या रोगाचे लक्षण आहे. डाग पानांच्या कडावरुन खालच्या बाजूला वाढत जातात. डाग एकमेकात मिसळून मोठे होत जातात. पाने जळालेली दिसतात. रोपाच्या सर्व पानांना लागण होते. पुनर्रोपणानंतर 30 दिवसांनी 10-15 दिवसांच्या अंतराने किंवा रोगाची लक्षणे दिसू लागल्यावर जिवाणूनाशक मेन्कोजेब 75%WP @ 50 ग्रॅम प्रति पम्प, ट्रायसाईकलाज़ोल @ 20 मिली प्रति पम्प, हेक्सकोनाज़ोल @ 20 मिली, प्रोपिकोनाज़ोल @ 20 मिली प्रति पम्प यांची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share