Nutrient Management in Pea

मटारसाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

पेरणीच्या वेळी 12 किलो नायट्रोजन प्रति एकरची आधारभूत मात्रा सुरुवातीच्या वाढीस उत्तेजन देण्यास पुरेशी असते. नायट्रोजनची अधिक मात्रा ग्रंथींच्या स्थिरीकरणावर दुष्प्रभाव टाकते. पीक फॉस्फरसच्या वापरास चांगली प्रतिक्रिया देते कारण ते मुळावरील गाठी वाढवून नायट्रोजन स्थिरीकरणास मदत करते. त्यामुळे मटारची उगवण आणि गुणवत्ता वाढते. रोपांची उगवण आणि नायट्रोजन स्थिरीकरण क्षमता वाढवण्यात पोटॅश उर्वरकांचाही प्रभाव कार्य करतो.

सामान्य शिफारस:-

उर्वरकांच्या वापरासाठीची सामान्य शिफारस पुढील बाबींवर अवलंबून असते:-

  • मृदा उर्वरकता आणि दिल्या जाणार्‍या कार्बनिक खतांची/ शेणखताची मात्रा
  • सिंचनाची परिस्थिति:- पावसावर अवलंबून की सिंचित
  • पावसावर अवलंबून असलेल्या पिकास उर्वरकांची अर्धी मात्रा देतात.

मात्रा किती, केवढी द्यावी:-

  • मटारच्या भरघोस उत्पादनासाठी 10 किलोग्रॅम यूरिया, 50 किलोग्रॅम डी.ए.पी, 15 किलोग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश आणि 6 किलोग्रॅम सल्फर 90% डब्लू.जी. प्रति एकर वापरतात.
  • शेताची मशागत करताना यूरियाची अर्धी मात्रा आणि डी.ए.पी, म्यूरेट ऑफ पोटॅश आणि सल्फरची पूर्ण मात्रा वापरतात. युरियाची उरलेली मात्रा दोन वेळा सिंचनाच्या वेळी द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient management in maize

मक्यासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • मक्याच्या अधिक उत्पादनासाठी उर्वरकांच्या संतुलित मात्रा वापराव्या.
  • मक्याचे पीक घेण्यापूर्वी 15-18 दिवस शेतात 8-10 टन/ एकर या प्रमाणात शेणखत मिसळावे.
  • पेरणीच्या वेळी यूरिया @ 65 किलो/ एकर + डीएपी @ 35 किलो/ एकर + एमओपी @ 35 किलो/ एकर + कार्बोफ्यूरान @ 5 किलो/ एकर या प्रमाणात मातीत मिसळावे.
  • पेरणीनंतर 15-20 दिवसांनी मॅग्नेशिय सल्फेट @ 10 किलो/ एकर + झिंक सल्फेट @ 07-10 किलो/ एकर + माईकोरायजा @ 04 किलो/ एकर या प्रमाणात द्यावे.
  • मक्याची लागवड फर्‍यात करणार असल्यास सूक्ष्म पोषक तत्वांची फवारणी फर्‍यांच्या मध्ये करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share