सामग्री पर जाएं
ग्राम व्यापाराची पिकांच्या विक्री या कार्यामध्ये मदत होत आहे. परंतु अनेक शेतकरी आपल्या पिकांची साठवणूक करुन पिकाची किंमत वाढल्यावर पीक विकण्यास तयार असतात. अशा स्थितीत बहुतांश शेतकरी आपली पिके घरामध्ये साठवणूक करुन ठेवतात. परंतु घरामध्ये पीक साठवणुकीत काही चूका होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे पिकांचे नुकसान देखील होऊ शकते. साठवणुकीत निर्माण होणाऱ्या या अडचणी आता ग्राम व्यापाराच्या माध्यमातून दूर केल्या जात आहेत.
ग्राम व्यापार शेतकऱ्यांना सुरक्षित पीक साठवणूक करण्याची सुविधा देणार आहे. सध्या ही सुविधा देवास येथील रुक्मणी वेअरहाऊस विजयगंज मंडी रोड आणि खंडवा येथील लक्ष्मी वेअरहाऊस, हरियाली बाजारजवळ, इंदौर रोड येथे सुरू करण्यात आली आहे. शेतकरी आता त्यांची सोयाबीन आणि मका ही पिके 3 महिने ते 8 महिन्यापर्यंत सुरक्षितपणे साठवू शकतात. या बदल्यात अल्प अशी रक्कम भरावी लागणार आहे यामध्ये सोयाबीनसाठी 60 रुपये प्रति टन/महिना आणि मका या पिकासाठी 70 रुपये प्रति टन/महिना द्यावे लागणार आहेत. साठवणूक या सेवेबरोबर आपणाला अनेक काही सुविधा देखील मिळणार आहेत, ज्यामध्ये साठवलेल्या पिकांवर कर्ज आणि मोठ्या सवलतीत कृषी उत्पादनांची उपलब्धता इत्यादि. त्यामुळे ग्राम व्यापाराच्या साठवणूक सेवेच्या सुविधांचा अवश्य लाभ घ्या आणि आपले पीक दीर्घकाळ सुरक्षित ठेवा.
Share