Advantages of N fixation bacteria in okra

नायट्रोजन उपलब्ध करून देणार्‍या (एन फिक्सेशन) जिवाणुंचे भेंडीच्या पिकासाठी लाभ

  • एझोटोबॅक्टर हे स्वतंत्रजीवी नायट्रोजन स्थिरिकरण आणि वायुविजन करणारे जिवाणू असतात.
  • हे जिवाणू वातावरणातील नायट्रोजनला सतत जमिनीत जमा करत राहतात.
  • त्यांच्या वापराने प्रत्येक पिकासाठीच्या नायट्रोजन उर्वरकाच्या आवश्यकतेत  20 % ते 25 % पर्यंत घट होते.
  • ते बीज अंकुरणाची टक्केवारी वाढवतात.
  • खोडे आणि मुळांची संख्या आणि लांबी वाढवण्यास ते मदत करतात.
  • त्यांच्या वापराने रोगांची शक्यता कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nitrogen deficiency in Cotton

कापसाच्या शेतातील नायट्रोजनचा अभाव:-

नायट्रोजनच्या अभावाने पाने पिवळट हिरव्या रंगाची होतात आणि पानांचा आकार देखील लहान होतो. ही कापसाच्या शेतातील नायट्रोजनच्या अभावाचे सर्वात मुख्य लक्षणे आहेत.  कोशिकांचा एंथोकायनिन नावाच्या लाल रंगद्रव्याच्या विकासाबरोबरच समन्वय तुटतो.  नायट्रोजनचा अभाव असलेल्या झाडाचा वानस्पतिक विकास देखील कमी होतो आणि झाड खुरटते.

नियंत्रण:- 19:19:19 @100 ग्रॅम प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of nitrogen in plants

रोपात नायट्रोजनची भूमिका:- नायट्रोजन खूप महत्वाचा असतो कारण तो रोपांद्वारे सूर्यप्रकाशाचा वापर करून पाणी आणि कार्बन डायऑक्साइडपासून शर्करा  बनवण्यासाठी (प्रकाशसंश्लेषण) लागणार्‍या क्लोरोफिलचा एक प्रमुख घटक आहे. तो अमीनो अॅसिडचा एक प्रमुख घटक आहे आणि प्रोटीन खंड निर्माण करतो. प्रोटीनच्या अभावी रोपे सुकून मरतात. काही  कुछ प्रोटीन संयंत्रे कोशिकांमध्ये संरचनात्मक एककांच्या स्वरुपात कार्यरत असतात तर काही एंझाईम्सच्या स्वरुपात कार्य करतात, ज्यात जैव रासायनिक प्रतिक्रियांवर जीवन आधारित असते. नायट्रोजन हा एटीपी (अ‍ॅडेनोसिन ट्रायफॉस्फेट) सारख्या ऊर्जा हस्तांतरण संयुगाचा एक घटक आहे. एटीपी कोशिकांमध्ये चयापचयात सुरू ऊर्जेचे संरक्षण आणि उपयोग करण्यास सहाय्यक असते. शेवटी, नायट्रोजन, डीएनए, कोशिका आणि शेवटी पूर्ण रोपाला विकसित आणि पुनरुत्पादित करण्यास सहाय्यकारी आनुवांशिक पदार्थ अशा न्यूक्लिक अॅसिडचा एक महत्वपूर्ण घटक आहे. नायट्रोजनखेरीज जीवन असूच शकत नाही हे आपण सर्वजण जाणतोच.

Share