- वाढीच्या हंगामात परिणाम झालेली रोपे काढून टाकून नष्ट करावी.
- प्रति एकरी 100 ग्रॅम वॅपकिल (अॅसिटाम्प्रिड) फवारावे. किंवा
- प्रति एकरी कॉन्फिडॉर (इमिडाक्लोप्रिड) 100 मिली + ब्युव्हेरिआ बॅसिआना (एक प्रकारची मित्र बुरशी) 250 ग्रॅम किंवा
- प्रति एकरी थिआमेथॉक्सॅम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेड सी 100 ग्रॅम फवारावे. किंवा
- प्रति एकरी अबॅसिन (अबॅमेक्टिन 1.8% ईसी) 150 मिली फवारावे.
चिबूड पिकावरील पाने खाणारी अळी कशी ओळखावी –
- पाने खाणारे प्रौढ कीटक लहान काळ्या पिवळ्या माशी प्रमाणे दिसतात
- अळ्या त्यांचा विकास पूर्ण झाल्यानंतर पानावरून निघतात आणि पानाच्या आत कोष बनवतात
- मादी माश्या पानाला भोके पाडतात, रोपाचा रस शोषून घेतात आणि पानाच्या पेशीमध्ये अंडी घालतात
- या नुकसानीमुळे रोपांची वाढ खुंटते परिणामी रोपातला जोम संपून जातो आणि फळांचे उत्पादन कमी येते
· पानांवर कुरतडल्यासारखे डाग दिसून येते
Shareचिबूड आणि कलिंगड पिकामध्ये चिमटी काढणे
- कलिंगडाच्या रोपाची अतिरेकी वाढ थांबवण्यासाठी चिमटी तयार केल्या जातात
- कलिंगडाच्या मुख्य खोडावर जेव्हा पुरेशी फळे असतात तेव्हा हे मुख्य जोमदार खोड नीट रहावे म्हणून
- चिमटीचा उपाय केला जातो
- चिमटी आणि नको असलेल्या जखमा कापून टाकल्यामुळे फळांना चांगले पोषण मिळते आणि फळे चांगल्या
- प्रकारे विकसित होतात.
- जेव्हा एखाद्या वेलीवर अधिक फळे असतात तेव्हा छोटी आणि अशक्त दिसणारी फळे काढून टाका म्हणजे मुख्य
- फळे अधिक चांगल्या प्रकारे वाढतात.
- अनावश्यक फांद्या काढल्यामुळे कलिंगडाला उत्तम पोषण मिळते आणि ते वेगाने वाढते.
खरबूज किंवा चिबुडा वरील शेंडे मर आणि मूळ क्षय रोग यांचे व्यवस्थापन
- वालुकामय जमिनीत हा रोग जास्त आढळतो.
- लागण झालेली रोपे आणि त्याचा कचरा नष्ट करावा.
- रोगमुक्त बियाणे वापरावे.
- बियाणे पेरण्यापूर्वी त्यावर कार्बेन्डाझिम ची प्रती किलो २ ग्राम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- खरबूज किंवा चिबुडावर हा रोग दिसून आल्यास तिथे प्रोपिकॉनाझोल २५% EC प्रति एकरी ८० ते १०० मिली वापरावे
खरबूज किंवा चिबुडा वरील शेंडे मर आणि मूळ क्षय रोग कसा ओळखावा
- रोपाच्या शेंड्याला तसेच मुख्य मुळाला प्रामुख्याने वेगळाच असा गडद तपकिरी रंगाचा पेशी नष्ट होऊन सडलेला भाग दिसतो.
- खोड आणि देठे यातही कुजणे वाढत जाते.
- परिणाम झालेला भाग मऊ आणि विसविशीत होतो.
- परिणाम झालेल्या रोपात मरगळलेल्या ची लक्षणे दिसतात.