How to Take care of insect pests & diseases at bud initiation stage of mungbean

मुगाचा फुलोरा येण्याच्या अवस्थेत कीड आणि रोगांपासून बचाव

    • मुगाच्या पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी कीड आणि रोगांचे नियंत्रण अत्यावश्यक असते.
    • कीड आणि रोगांमुळे मुगाच्या उत्पादनाची सुमारे 70% हानी होऊ शकते.
    • उन्हाळ्यात फुलोरा येण्याच्या आणि फलधारणेच्या वेळी फळ पोखरणारी अळी, तंबाखू अळी इत्यादि किडीमुळे  नुकसान होते.
    • शेंगा येणार्‍या इतर पिकांप्रमाणे मुगाचे पीक देखील बुरशी, जिवाणू आणि विषाणूमुळे होणार्‍या रोगांबाबत अतिसंवेदनशील असते. पाने, खोड आणि मुळांवर मर रोग, पिवळेपणा आणि मुळांचा कुजवा पिकाच्या वाढीदरम्यान आढळून येतात.
    • किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफोस 36% एसएल @ 300 मिली/ एकर, इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी @ 100 ग्रॅम/ एकर (फळावरील अळीसाठी) आणि फ्लुबेंडामाइड  20% डब्लू जी 100 मिली/ एकर किंवा इंडोक्साकार्ब 14.5 % एस सी @ 160-200 मिली/ एकर (तंबाखू अळीसाठी) वापरता येते.
    • रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम/ एकर (मर रोगासाठी) आणि थायोफनेट मिथाइल 70% डब्ल्यू पी @ 250-300 ग्रॅम प्रति एकर (मातीजन्य रोगांसाठी) वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Virus problem and solution in mungbean

मुगाच्या पिकातील विषाणूची समस्या आणि उपाय

  • मुगाच्या पिकाच्या विकासाच्या दरम्यान पीत केवडा, पर्ण सुरळी, आणि पान सुरकुत्या अशा विषाणूजन्य रोगांची लक्षणे दिसतात.
  • रोपाचे वय आणि रोगाच्या लक्षणांची सुरुवात यानुसार विषाणूमुळे मुगाच्या पिकाच्या उत्पादनात 2-95% घट होऊ शकते.
  • या रोगांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी थायमेथोक्साम 25% डब्ल्यूजी @ 60-100 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात पानांवर फवारावे किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 100 मिली  प्रति एकर या प्रमाणात पानांवर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share