दरवर्षी केंद्र सरकारन 23 पिकांचे एमएसपी निश्चित करत असते, म्हणजेच समर्थन किंमत आणि नंतर या किंमतीवरती राज्य सरकार शेतकर्यांकडून धान्य खरेदी करते. मध्यप्रदेश सरकारने रब्बी हंगामातील मुख्य पीक गहू खरेदीसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत आधार दरावर नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.
अहवालानुसार मध्य प्रदेशातील 21 लाख 6 हजार शेतकर्यांनी यावेळी ई-खरेदी पोर्टलवर एमएसपीवर गहू खरेदीसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 1 लाख 59 हजारांहून अधिक आहे. मध्य प्रदेशातील इंदौर आणि उज्जैन जिल्ह्यात गहू खरेदीची प्रक्रिया 22 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.
स्रोत: किसान समाधान
Share