- मध्य प्रदेशमधील बर्याच जिल्ह्यात मूग पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
- मूग या पिकाचा डाळींच्या प्रमुख पिकांमध्ये समावेश होतो आणि अल्पावधीतच चांगले उत्पादन दिले जाते.
- मूग पिकाच्या पेरणीनंतर सुमारे 20 ते 30 दिवस शेतकऱ्यांनी तणांवर विशेष लक्ष द्यावे.
- याचे कारण असे आहे की, सुरुवातीच्या काळात तण पिकांचे सर्वात जास्त नुकसान करतात.
- मुग पिकांमध्ये एकरी पेन्डीमिथालीन 38.7 सीएस 700 मिली / दराने पूर्व-उदयोन्मुख तण म्हणून शेतकऱ्यांनी वापर करावा.
मूग पिकामध्ये तण व्यवस्थापन कसे करावे?
मूगातील तण व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे कार्य आहे, जे न केल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट हाेते. हि तणे मूग पिकाची पोषकद्रव्ये, पाणी , प्रकाश, स्थान इत्यादींमध्ये स्पर्धा करतात आणि पिकाची वाढ, उत्पादन आणि गुणधर्म कमी करतात. किडे, कीटक, रोग इत्यादी कारणांपेक्षा तणांमुळे होणारे नुकसान जास्त होते. तण नियंत्रणामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे योग्य वेळी तण नियंत्रित करणे. पुढीलप्रकारे तण प्रतिबंधित केले जाऊ शकते.
प्रतिबंध पद्धत- या पद्धतीत सर्व क्रियांचा समावेश आहे, ज्याद्वारे शेतात तणांचे प्रवेश रोखता येऊ शकते जसे की, प्रमाणित बियाण्यांचा वापर, चांगल्या कुजलेल्या शेण आणि कंपोस्ट खतांचा वापर, सिंचन नाल्यांची साफसफाई जमिनीची मशागत किंवा पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची वापरा पूर्वी योग्य साफ सफाई इत्यादी.
यांत्रिकी पद्धत- तण नियंत्रित करण्याची ही एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. पिकांच्या सुरुवातीच्या काळात पेरणी नंतर 15 ते 45 दिवसांत पिकांना तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. साधारणपणे दोन वेळा खुरपणी करावी. पहिली पेरणीनंतर 15-20 दिवसांनंतर आणि दुसरी 30-35 दिवसांनी केल्यामुळे तणनियंत्रण निट पध्दतीने होते. परंतु यामध्ये जास्त काळजी घेतली पाहिजे नाही तर पिकांच्या मुळांना नुकसान होते तसेच वेळ जास्त लागतो आणि मजुरीदेखील जास्त लागते.
रासायनिक पद्धत- तणनाशकांचा वापर करून तणांचे योग्य नियोजन करता येते. या पद्धतीमुळे वेळ बचतीसह प्रति हेक्टर खर्च कमी होतो. परंतु या रसायनांचा वापर करताना सावधानी बाळगणे आवश्यक आहे. तणनाशकाचे प्रमाण, वापरायची वेळ, त्याचा प्रकार, पीक इत्यादी बाबी लक्षात घेऊनच तणनाशकाचा वापर करावा. पेंडीमेथिलिन (स्टोम्प एक्सट्रा ) सारखे तणनाशक पेरणीनंतर ७२ तासांच्या आत ७०० मिली प्रति एकर प्रमाणे २०० लिटर पाण्यात मिसळून वापर करावा. मुगाच्या पिकात मोठ्या पानाचे तण २-४ पानाच्या अवस्थेत असताना क्विझलफोप इथाईल ५ इ सी (टरगा सुपर) किंवा प्रॉपाकूझालोफोप १० इ सी ३०० मिली प्रति एकर प्रमाणे २०० लिटर पाण्यात मिसळून वापर करावा.
Share