निमार येथील मिरचीची तिखट चव मध्यप्रदेशच्या रहिवाशांमध्ये आधीच प्रसिद्ध आहे. आणि आता ही प्रसिद्धी सर्व देशभर पसरणार आहे. ही ओळख आता कदाचित सगळ्या जगात जाईल. हे आता येणाऱ्या मिरची महोत्सवामुळे घडेल. हा मिरची महोत्सव दिनांक २९ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात कसरावद, मध्य प्रदेश येथे होईल. याला स्थानिक भाषेत मिर्च महोत्सव असे नाव आहे. हा दोन दिवसांचा राज्य स्तरीय उत्सव निमार च्या मिरचीला देशात आणि जगात प्रसिद्ध करण्याच्या प्रमुख उद्देशाने मध्यप्रदेश सरकार आयोजित करत आहे.
या उत्सवामुळे या विभागात मिरचीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्वात जास्त फायदा होईल. यामुळे निमार आणि आसपासच्या प्रदेशात पिकवल्या जाणाऱ्या मिरचीचे ब्रॅण्डिंग होईल आणि त्यांना नवीन बाजारपेठा सर्व देशात आणि परदेशात उपलब्ध होतील.
या उत्सवात २५ हून अधिक कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मिरची उत्पादनंशी संबंधित अशी महत्त्वाची माहिती देतील. आमचा ग्रामोफोन येथे आपल्या सेवेत उपस्थित असेल. म्हणजे आपण आमच्या कृषी तज्ञांना देखील शेती विषयक कोणताही सल्ला किंवा सूचना याबद्दल विचारू शकाल.
Share