शिवराज सरकारचा निर्णय, पिकांचे नुकसान झाल्यास आपल्याला किमान 5000 रुपये मिळणार

नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकर्‍यांच्या पिकांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. आता या नुकसानीची भरपाई करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने निर्णय घेतला आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी किमान 5 हजार रुपये दिले जातील.

राज्याचे मुख्यमंत्री श्री.शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामध्ये नैसर्गिक आपत्तींसोबत वन्यजीवांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अनुदान देण्याचेही सांगण्यात आले आहे.

स्रोत: कृषक जगत

Share