सामग्री पर जाएं
पावसाळ्याच्या हंगामादरम्यान प्राण्यांना अनेक संसर्गजन्य रोग होतात. यापैकी अनेक रोगांवर नियंत्रण सहज मिळू शकते. मात्र, अनेक असे रोग आहेत की, ज्यांचे संक्रमण प्राण्यांमध्ये वेगाने पसरते. यावेळी असाच एक रोग प्राण्यांसाठी प्राणघातक ठरला आहे आणि त्या रोगाचे नाव ‘लम्पी स्किन डिजीज’ असे आहे.
लम्पी स्किन डिजीजची लक्षणे –
या रोगांमध्ये प्राण्यांच्या शरीरावरती मोठ्या गाठी तयार होतात. विशेषत: हे संक्रमण शरीराच्या डोके, मान आणि जननेंद्रियाच्या आसपास अधिक असते. वेळेवरती उपचार न केल्यास याच गाठी मोठ्या होऊन त्याच्या जखमा तयार होतात. यामुळे प्राण्यांना तीव्र ताप येतो. या आजारांमध्ये प्राणी दूध देणे सुद्धा बंद करतात कधीकधी तर त्यांचा मृत्यूही होतो. हा रोगाची गाय-म्हैस या प्राण्यांना सर्वात जास्त लागण होते.
रोगापासून प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे?
प्रथम, आजारी प्राण्याला उर्वरित निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवा. यानंतर, ताबडतोब प्राण्याला पशुवैद्याकडे उपचारासाठी घेऊन जा. त्याचबरोबर जनावरांना विनाकारण बाहेर फिरू देऊ नये, असा सल्ला पशुवैद्यकीय रुग्णालयाकडून दिला जात आहे.
उपचारासाठी अनुदान मिळत आहे?
प्राणघातक होत असलेल्या या ‘लम्पी स्किन डिसीज’ पासून प्राण्यांना वाचवण्यासाठी राजस्थान सरकार अनुदान देत आहे. या भागामध्ये राज्य सरकारने आपत्कालीन जीवनावश्यक औषधांच्या खरेदीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येकी एक लाख रुपये यापूर्वीच जारी केले आहेत. यासोबतच पॉली क्लीनिकला 50-50 हजार रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय राज्य वैद्यकीय पथके आणि शेजारील जिल्ह्यातील पथके अधिक बाधित ठिकाणी जनावरांवर तात्काळ उपचारासाठी पाठवण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत पशुपालकांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून ते या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात सापडणार नाहीत.
स्रोत : कृषि समाधान
Share