Management of Leaf reddening in Cotton

कापसाच्या पिकावरील पाने लाल होण्याच्या रोगाचे नियंत्रण:-

  • बोंडे विकसित होण्याच्या वेळी प्रतिकूल हवामानापासून बचाव करण्यासाठी सुयोग्य वेळी पेरणी करावी.
  • योग्य वेळी यूरिया (1%) च्या एक-दोन फवारण्या कराव्यात.
  • पेरणीच्या 40-45 दिवस आधी मॅग्नीशियम सल्फेट 10-12 किलो प्रति एकर मात्रा द्यावी.
  • पाणी तुंबण्यापासून बचाव होण्यासाठी पाण्याचा निचरा होण्याची योग्य ती व्यवस्था करा.
  • प्रसाराचे कारण असलेल्या रस शोषणार्‍या किड्यांच्या प्रतिबंधासाठी शिफारस केलेली कीटकनाशके वापरावीत.
  • अतिरिक्त बोंडे लागल्यास त्याचे व्यवस्थापन करावे.
  • फुले आणि बोंडांच्या विकासाच्या दरम्यान, विशेषता संकरीत वाणासाठी,  पुरेशी पोषक तत्वे द्या.
  • अंतर्क्रिया, निंदणी आणि शेतीची इतर कामे वेळेवर करा.
  • ज्या वाणांमध्ये ही समस्या उत्पन्न होते त्यांची लागवड करू नये.
  • उपलब्ध असल्यास पुरेसे सिंचन करावे.
  • मातीचे आरोग्य आणि पोषकता टिकवण्यासाठी पीक चक्र आणि आंतरपिके वापरावीत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share