Control of Leaf Miner in Cowpea

चवळीवरील पाने पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण

चवळीवरील पाने पोखरणारी अळी :-

कशी ओळखावी:-

  • वयात आलेल्या अळया लहान आणि नाजुक असतात. त्यांचा आकार इंचाचा आठवा भाग एवढा असतो.
  • त्या काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या असतात.
  • अंडी गोल, सूक्ष्म आणि पिवळट पांढरी असतात.
  • लार्वा पांढर्‍या रंगाचे असून डोक्याच्या बाजूला पिवळे असतात. पूर्ण विकसित झाल्यावर त्यांचा आकार एका इंचाच्या सहाव्या भागाएवढा असतो.

हानी:-

  • मादी आपल्या टोकदार प्रजनन अंगाद्वारे पानांच्या उतींमध्ये प्रवेश करून 300-400 अंडी देते.
  • अंड्यातून निघालेले लार्वा माईन्स पानांच्या मिसोफिल उती वाकड्या तिकड्या आकारात खातात.
  • पाने पोखरणार्‍या अळीचा हल्ला होताच पानांवर चमकदार पांढर्‍या रेषा उमटतात.
  • पूर्ण वाढ झालेल्या अळया पानात भोके पाडून कोशिका रस शोषतात.
  • कीडग्रस्त रोपांच्या फलन आणि फुलन क्षमतेवर विपरीत प्रभाव पडतो.

नियंत्रण:-

  • डायक्लोरोवास 40 मिली. + नीम तेल 50 मिली. प्रति पम्प फवारावे.
  • डायमिथोएट 40 मिली. किंवा कारटाप हाईड्रो क्लोराईड 75% SG 20 ग्राम/ प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of leaf miner in Tomato

पाने पोखरणारी अळी ही टोमॅटोच्या पिकावरील प्रमुख कीड असून ती सुरुवातीच्या अवस्थेत पिकाला हानी पोहोचवते. टोमॅटोवरील पाने पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण करण्यासाठी ट्रायजोफॉस 40% EC @ 40 मिली /15 लीटर पाणी किंवा करटोप हाइड्रो क्लोराइड 50% SP @ 25 ग्रॅम/ 15 लीटर पाणी याची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share