कृषी उदान योजनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, काय फायदा होईल जाणून घ्या?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कृषी उदान योजना सन 2020-21 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीस मदत केली जाईल. या योजनेद्वारे दूध, मासे, मांस इत्यादी नाशवंत उत्पादने योग्य वेळी हवाईमार्गे बाजारात आणली जातील. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना जास्त भाव मिळू शकेल. या योजनेसाठी शेतकरी बांधव ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
या योजनेत सामील होण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी प्रथम बागायती किंवा खाद्यप्रक्रिया विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. येथे उपलब्ध असलेल्या कृषी उदान योजनेच्या लिंकवर क्लिक करा. योजनेसंदर्भात दिलेली मार्गदर्शक तत्त्वे वाचा आणि पुढे चला. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी फॉर्म उघडला जाईल. कागदपत्रांची माहिती येथे भरा आणि शेवटी ती सबमिट करा.
स्रोत: कृषि जागरण
Share