पंतप्रधान किसान योजना
पंतप्रधान किसान सन्मान निधी (सर्वसाधारणपणे याला पंतप्रधान किसान योजना म्हटले जाते) ही केंद्र सरकारची एक योजना आहे, जिचा उद्देश भारतीय शेतकऱ्यांना उत्पन्नाला आधार देणे हा आहे जेणेकरून ते शेतीविषयक विविध आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील. ही योजना २४ फेब्रुवारी २०१९ ला माननीय पंतप्रधानांनी सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होती, पण आता तिचा विस्तार करून सर्व शेतकरी कुटुंबांना त्यांच्या शेत जमिनीचा आकार विचारात न घेता यात सामील केले आहे.
या योजनेचे फायदे
पंतप्रधान किसन योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबास प्रति वर्ष सहा हजार रुपये दिले जातील. ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यात प्रत्येक चार महिन्यांनी दिली जाईल.
ही योजना लाखो शेतकऱ्याना फायदेशीर ठरली आहे. एका माध्यम वृत्तानुसार नोव्हेंबर २०१९ पर्यंत ७.६ कोटी शेतकऱ्यांना याचे फायदे मिळाले आहेत. आता सरकारने या योजनेत अधिक काही वैशिष्ट्ये वाढवली आहेत. या योजने बरोबर इतर अनेक जास्तीचे फायदे व सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
Share